नगर जिल्हा परिषदेचे 66 गण खुले!

नगर जिल्हा परिषदेचे 66 गण खुले!

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील चौदा पंचायत समित्यांसाठी एकूण 170 गण आहेत. त्यापैकी 38 गण अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. एकूण गणांच्या 50 टक्के जागा महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे 85 गण महिलांसाठी असणार आहेत. यामध्ये जाती व जमातीच्या 19 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे उर्वरित 66 गण हे सर्वसाधारण असणार आहेत.

दरम्यान, ओबीसी आरक्षण नसल्यामुळे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील इच्छुक उमेदवार आपले नशीब या गणांतून अजमावणार आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढविण्यासाठी रस्सीखेच होणार आहे.मात्र, कोणत्या पंचायत समितीचे कोणते गण खुले असणार याचा फैसला 13 जुलै रोजी आरक्षण सोडतीत होणार आहे.

१४ पंचायत समित्यांचा कार्यकाल संपला

अहमदनगर जिल्हा परिषद व अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, नगर, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी, कर्जत व जामखेड या चौदा पंचायत समित्यांच्या पदाधिकार्‍यांचा कालावधी मार्च महिन्यात संपला आहे. दरम्यान, कालावधी संपण्यापूर्वीच राज्य शासनाने गट व गणांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी 85 गट व 170 गण असणार आहेत. त्यानुसार गटव गणांची रचना अंतिम झाली आहे.

सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य शासनाने आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या बुधवारी (दि.13) पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत त्या त्या पंचायत समित्यांच्या तहसील कार्यालयात होणार आहे. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या एकूण 36 लाख 4 हजार 668 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची 4 लाख 45 हजार 595 तर अनुसूचित जमातीची 3 लाख 57 हजार 412 लोकसंख्येचा समावेश आहे. लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी 22 व अनुसूचित जमातीसाठी 16 गण राखीव आहेत.

प्रत्येक पंचायत समितीनिहाय अनुसूचित जाती, जमाती व महिला प्रवर्गासाठी किती गण असणार आहेत. हे जवळपास निश्चित केले आहेत. बुधवारी (दि.13) प्रत्येक पंचायत समितीची आरक्षण सोडत होणार आहे. यावेळी अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी तसेच महिला प्रवर्गासाठी कोणते गण राखीव झाले हे समजणार आहे. आरक्षण सोडत कार्यक्रमात ओबीसी सोडतीचा उल्लेख नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीला ओबीसी आरक्षण नसल्यामुळे खुल्या जांगांसाठी संख्या वाढली आहे.

अनु. जमाती संभाव्य गण (महिलांसाठी राखीव) : अकोले 6 (3), नेवासा 1 (0), संगमनेर 2 (1), कोपरगाव 2 (1), राहाता 1 (1), श्रीरामपूर 1 (0), शेवगाव 0, पाथर्डी 0, नगर 0, राहुरी 1 (1), पारनेर 1 (0), श्रीगोंदा 1 (1), कर्जत 0(0), जामखेड 0.

पं.स. संभाव्य खुल्या जागा (कंसात महिला) : अकोले 2 (3), संगमनेर 8 (8), कोपरगाव 4 (4), राहाता 5 (4), श्रीरामपूर 3 (4), नेवासा 6 (7), शेवगाव 4 (5), पाथर्डी 5 (4), नगर 6 (6), राहुरी 5 (4), पारनेर 4 (6), श्रीगोंदा 6 (5), कर्जत 5 (4), जामखेड 3 (2).

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news