Manushi Chhillar : मिस वर्ल्ड मानुषी जगते ग्लॅमरस लाईफ, पाहा तिचे हाॅट फोटो

manushi chillar
manushi chillar
Published on
Updated on

पुढारी आॅनलाईन डेस्क

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) पहिल्यांदा बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. तेदेखील एका शौयार्ची गाथा असलेल्या ऐतिसाहिक चित्रपटातून. या अभिनेत्रीच्या करिअरसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. ज्या दिवसाची प्रतीक्षा प्रेक्षक करत होते, ती प्रतीक्षा संपली आहे. आपल्या चित्रपटाच्या रिलीजच्या आधी मानुषीने साडीमध्ये तसेच अन्य ड्रेसेसमध्ये सुंदर फोटो शेअर केले आहेत. मानुषीच्या फॅन्सच्या उड्या तिच्या फोटोंवर पडत असून कमेंट्स करायचा मोह त्यांना आवडत नाहीये. (Manushi Chhillar)

'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटामध्ये राजकुमारी संयोगिताची भूमिका साकारलेली मानुषी छिल्लरचा फोटो आणि मनमोहक हास्य फॅन्सच्या इतक्या पसंतीस उतरलं की, कमेंट सेक्शनमध्ये चाहते भरभरून कमेंट करत आहेत.

मानुषी छिल्लर, अक्षय कुमार, डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी राय बुधवारी 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी पिथोरा किल्ल्यावर पोहोचले होते. सम्राट पृथ्वीराज यांच्या पुतळ्याला त्याने पुष्पांजली वाहिली होती. मानुषीने हे फोटोशूट दिल्ली दौऱ्यातच केले आहे. यशराज फिल्म्सने पहिल्यांदाच एक ऐतिहासिक चित्रपट बनवला आहे, जो मनोरंजनाने परिपूर्ण आहे. या चित्रपटाबाबत मानुषीला खूप आत्मविश्वास आहे.

मानुषी छिल्लर अक्षय कुमारसोबतच्या तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'सम्राट पृथ्वीराज'चे स्टार्स मोठ्या उत्साहात या ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी होते. आज प्रदर्शित होणाऱ्या 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटात अक्षय कुमार, मानुषी छिल्लरशिवाय सोनू सूद, संजय दत्त यांसारखे दिग्गज कलाकारही दिसणार आहेत.

'सम्राट पृथ्वीराज' आज देशभरात सुमारे 4 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे.

ओमान-कुवैतमध्ये बॅन झाला चित्रपट

सम्राट पृथ्वीराज रिलीज होण्याच्या एक दिवस आधी ओमान-कुवैतमध्ये बॅन करण्यात आला आहे. 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट शुक्रवारी म्हणजेच आज ३ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. रिलीजपूर्वीच चित्रपट निर्मात्यांना आणखी एक झटका बसला आहे. रिपोर्टनुसार, अक्षय कुमारच्या चित्रपटावर कुवैत आणि ओमानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

शूर योद्ध्याच्या जीवनावर बनलेला 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अनेक अडचणींनी घेरला आहे. याआधी करणी सेनेने चित्रपटाच्या टायटलला विरोध दर्शवला होता. यानंतर गुर्जर समाजानेही आपली बाजू मांडली. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पाहून त्याचे शीर्षक बदलण्यात आले. त्याचबरोबर हा चित्रपट कुवैत आणि ओमानमध्ये प्रदर्शित होणार नसल्याचे आता बोलले जात आहे.

चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मानुषी छिल्लर पडद्यावर संयोगिता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. भारताचे महान योद्धा सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या पराक्रमाची गाथा प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पण आता अचानक कोणत्याही देशात चित्रपटावर बंदी येणे ही चित्रपट चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. चित्रपटावर बंदी का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मानुषी मिस वर्ल्ड म्हणून निवडून आली तेव्हा ती हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण घेत होती. मानुषी सोनीपतच्या खानपूर कलान गावात असलेल्या भगत फूल सिंग सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस करत होती. मानुषीचे कुटुंब हरियाणाचे असले तरी ते सध्या दिल्लीत राहतं.

मानुषीबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल की, तिने मिस वर्ल्डच्या किताबच्या तयारीसाठी अभ्यासातून एक वर्षाचा ब्रेक घेतला. मानुषी दिसायला अगदी साधी आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की तिला पॅराग्लायडिंग, बंजी जंपिंग, स्कूबा डायव्हिंग यांसारखे ऍथलेटिक खेळ आवडतात. तिला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ती अशा खेळांसाठी वेळ काढते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news