ऑस्ट्रेलियात 4500 वर्षांपूर्वीचे सागरी गवत

ऑस्ट्रेलियात 4500 वर्षांपूर्वीचे सागरी गवत

सिडनी : जगात अनेक जुने वृक्ष आढळतात. कॅलिफोर्नियात हजार-दोन हजार वर्षांपूर्वीचेही उंच वृक्ष आहेत. मात्र, आता ऑस्ट्रेलियात जमिनीवर नव्हे तर समुद्रतळाशी असे गवत आढळले आहे ज्याचे बीजारोपण तब्बल 4500 वर्षांपूर्वी झाले होते. पाण्याखाली पसरलेले हे गवत म्हणजे एकाच रोपट्याचे रूप आहे. सुमारे 4500 एकाच बीजारोपणातून त्याचा विस्तार झाला होता असे संशोधकांनी म्हटले आहे. हे सागरी गवत 180 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेले एकाच रोपट्याचे रूप आहे.

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते, शार्क बेमध्ये सामान्यपणे रिबन वीड ही गवताची प्रजाती आढळून येते. तिच्या अभ्यासासाठी संशोधक गेले असताना संपूर्ण खाडीतून गवताचे नमुने संकलित करण्यात आले. 18 हजार जेनेटिक मार्क्सचा यामध्ये अभ्यास करण्यात आला. त्यामधून प्रत्येक नमुन्याचे फिंगरप्रिंट तयार करून संशोधन झाले. वास्तविक किती प्रकारचे गवत मिळून समुद्रातील गवताळ मैदान तयार होते, हे संशोधकांना जाणून घ्यायचे होते.

या संशोधनाबाबतची माहिती प्रोसिडिंग्ज ऑफ द सोसायटी बीमध्ये प्रकाशित झाली. संशोधक जेन एडगेलो म्हणाले, शार्क बेमध्ये केवळ एक रोपटे होते. आता त्याचा विस्तार 180 किलोमीटर इतका झाला आहे. हे आजवरचे पृथ्वीवरील ज्ञात असे सर्वात मोठे रोपटे ठरले आहे. खाडीतील वेगवेगळ्या परिस्थितीतही हे रोपटे टिकून आहे. जेन यांच्या सहकारी डॉ. एलिझाबेथ सिंकलेअर म्हणाल्या, कोणतीही फुले आली नसताना आणि बीजांचे उत्पादन झालेले नसतानाही हे रोपटे हजारो वर्षे टिकून आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news