पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उपसत राज्यभर रान उठविणारे मनोज जरांगे पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्ह्यात जरांगे पाटलांच्या विविध ठिकाणी सभा होणार असून, या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील सभेने आजवरचे सगळे रेकाॅर्ड मोडीत काढले आहेत. आता ते राज्यभर दौरे करत मराठा आरक्षणाचा आग्रह धरत आहेत. मराठा समाजाचा त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला असून आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात असताना जरांगे पाटील यांची पुण्यात मोठी सभा होत आहे. या सभेकडे पुणे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. राजगुरुनगर आणि बारामतीमध्ये तीन हत्ती चौकात मनोज जरांगे पाटलांच्या सभा होणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांची तोफ ऐतिहासिक फलटणनगरी व दहिवडीमध्ये आज, शुक्रवारी धडाडणार आहे. सायंकाळी 5 वाजता फलटणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तर रात्री 8 वाजता दहिवडीतील इंगळे मैदानावर होणार्या जाहीर सभांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दोन्ही सभांना मराठा समाज लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिली.
हेही वाचा