पुढारी, ऑनलाईन डेस्क : झी-टीव्ही वरील प्रसिद्ध मालिका 'झांसी की रानी' मध्ये महत्त्वाची भूमिका असलेली मनुकर्णिका म्हणजेच मनू सध्या तिच्या नवीन लूकमधील फोटोंमुळे चर्चेत आहे. मनू म्हणजेच अभिनेत्री अल्का गुप्ताचा सध्याचा लूक बघून, तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यावर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
झाशी की रानी या टीव्ही मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. यामधील मणिकर्णिकाची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अल्का गुप्ता हिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला हाेता. या मालिकेने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. 'झांसी की रानी' मधील मनू म्हणजेच अलकाचा आत्ताचा लूक पूर्णपणे बदलेला पाहून चाहतेही आश्चर्यचकीत झाले.
अलका गुप्ताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फाेटाेत ती खूपच ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. तिचे फोटो पाहून, एका युजर्सने म्हटले आहे, ' विश्वास बसत नाही की, ही तिच चिमुरडी आहे'. तर दुसऱ्या युजर्सने म्हटले आहे, 'क्या बात है कितनी बदल गई हैं' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अलका लवकरच स्टार प्लस वरील 'बनी चाऊ होम डिलिव्हरी' मध्ये दिसणार आहे.