पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनची (Ukraine) राजधानी कीव्हवर चौफेर हल्ला करण्याचे आदेश रशियन लष्कराला देण्यात आले आहेत. युक्रेनचे लष्करही तितक्याच जाेरदारपणे रशियाला प्रत्युत्तर देत आहे. फुटीरवादीही कीव्ह शहरात घुसखाेरी करत आहेत. आता युक्रेनच्या दक्षिणेकडील नोव्हा काखोव्हाका या शहरावरही रशियाने ताबा मिळवला आहे.
भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी असलेले नोव्हा काखोव्हाका हे छोटे शहर आहे. हे शहर ताब्यात घेत रशियाच्या सैन्यांनी मुख्य प्रशासकीय ठिकाणांवर नियंत्रण मिळवले आहे. या शहरांमधील संवेदनशील ठिकाणांना रशियन सैन्याने लक्ष्य करत युक्रेनचा (Ukraine) ध्वज खाली उतरवला आहे.
दरम्यान, आज कीव्हमध्ये दाेन मोठे स्फोट झाले. यामध्ये एका तेलाच्या टँकरला आग लागली. शहराच्या दक्षिणेकडे हे स्फोट झाले. ज्या परिसरात हे स्फोट घडून आले त्या ठिकाणी युक्रेन मोठे लष्करी तळ आणि तेलाचे अनेक टँकर्स आहेत. सीएनएन या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
अमेरिका, युरोपियन कमिशन, फ्रान्स, जर्मनी, इटली, युनायटेड किंगडम आणि कॅनडा यांनी अनेक रशियन बँकांना स्विफ्टमधून निलंबित केले आहे. SWIFT हे असे नेटवर्क आहे ज्या माध्यमातून बँका पैसे ट्रान्सफर इतर देवाणघेवाण करण्यासाठी सुरक्षित संदेश पाठवला जातो. जवळपास २०० देशातील ११ हजार वित्तीय संस्था SWIFT प्रणालीचा वापर करतात. international financial transfer system चा SWIFT हा मुख्य कणा आहे.
हेही वाचलंत का ?