वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन
रशिया आणि युक्रेनमध्ये ( Russia-Ukraine War ) भडकलेले युद्ध दिवसोंदिवस अधिक आक्रमक होत आहे. युक्रेनने आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्याने रशियाने हल्ले वाढवले आहेत. रशियन सैन्याने चार बाजुंनी कोंडी करत युक्रेनची दुसरे सर्वात मोठे शहर खारकीवमधील गॅस पाईपलाईन उडवून दिली. तसेच एका पेट्रोल साठवणूक केंद्रावरही क्षेपणास्त्रही डागले. रशिया अधिक आक्रमक झाल्याने अमेरिकेने रशियाला आता निर्वाणीचा इशारा दिला आहे.
एका मुलाखतीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बाडयन यांनी सांगितले की, " रशियाला थांबविण्यासाठी सध्या तरी दोनच पर्याय आहेत. रशियाविरोधात सरळ युद्धच करावे आणि तिसर्या महायुद्धाची सुरुवात होईल. दुसरा पर्याय असा आहे की, जो देश आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करेल, त्याला मोठी किंमत चुकवावी लागेल. रशियावर लादलेल्या प्रतिबंधांमुळे एकमात्र पर्याय उरतो तो तिसर्या महायुद्धाचा. कारण रशियावर लादलेले निर्बंधाचा मोठा परिणाम होणार आहे".
सध्या रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये आर्थिक व व्यवसायिक बाबींचा समावेश आहे. याचा मोठा दुष्परिणाम होईल, अशी भीती बायडेन यांनी व्यक्त केली. दरम्यान, अमेरिका, युरोपीय संघ आणि ब्रिटनने रशियाच्या सेंट्रल बँकेवरही प्रतिबंध लादले आहेत. अमेरिका व मित्र राष्ट्रांनी रशियाबरोबरील सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे मोठे परिणाम दिसणार आहे. या निर्बंधांमुळे रशिया युरोपला करत असलेला कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे बंद करेल. यामुळे युरोपमध्ये मोठे ऊर्जा संकट येण्याची शक्यताही विश्लेषक व्यक्त करत आहेत.
युक्रेनच्या मदतीसाठी जर्मनी सरसावली आहे. जर्मनीने युक्रेनला शस्त्रसाठा, रणगाडे आणि क्षेपणास्त्रांचा पुरवठा केला आहे. त्याचबरोबर जर्मनीने रशियाला हवाई वाहतूकही बंद केली आहे.