malaika : मलायकाचा खिसा असणारे बूट हवे असतील तर मोजावी लागेल इतकी किंमत

malaika arora -arjun kapoor
malaika arora -arjun kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री मलायका अरोरा यावेळी जेव्हा तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत विमानतळावर पाहण्यात आलं, तेव्हा तिच्या स्टाईलने पुन्हा एकदा सर्वांना इम्प्रेस केलं. नंतर जेव्हा तिच्या लुकशी संबंधित कपडे आणि बुटाची किंमत शोधण्यात आली तेव्हा अनेकांची तोंडे उघडे राहिली. बुटाची किंमत पाहून तर अनेकांचे डोळे विस्फारले. तिच्या संपूर्ण लूकची किंमत इतकी आहे की, ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही. (malaika )

मलायका अरोरा आपल्या फॅशनमध्ये स्वस्त ते महागड्या वस्तूंचा समावेश करण्यासाठी ओळखली जाते. कधी ती इतक्या साध्या ड्रेसमध्ये दिसते की, कॉलेज गर्ल्स देखील अगदी सहजपणे पॉकेट मनी वाचवून खरेदी करू शकतील. तर अनेकदा असे कपडे आणि शूज घालते की, सर्वसामान्यांना तिच्या इतक्या महागड्या वस्तू परवडणारे नाहीत.

पॉलिएस्टरपासून तयार करण्यात आलेल्या ड्रेसची किंमत पाहिली तर इंटरनेट उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ड्रेसची किंमत जवळपास २ लाख ६६ हजार ९७ रुपये आहे.

महागडे ब्लॅक बूट्स

मलायकाने सुंदर शॉर्ट ड्रेस काळ्या हिल्ससह पेअर केला आहे. हे शूज लेदर आणि नायलॉनच्या मिश्रणातून बनवले गेले होते, ज्यामुळे ते केवळ मजबूतच नव्हते तर चमकदार देखील होते.

शूजमध्ये खिसे

सर्वात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या बुटाच्या बाजूला असलेले खिसे. तिने फक्त एक अनोखा टच जोडला नाही तर तिला एक सुपर कूल देखावादेखील दिला.

मलायका अरोरा हिला इटालियन लक्झरी फॅशन हाऊस प्राडाकडून हे सुपर स्टायलिश आणि मस्त बूट मिळाले आहेत. शूजवरही त्याचा लोगो दिसत होता.

इतके पैसे दिले

अधिकृत साईटवर या शूजची किंमत $१,६५० आहे. म्हणजेच, जर मलायकाने ते खरेदी केले, तर तिला सुमारे १ लाख २९ हजार १३५ रुपये खर्च करावे लागले असते. हा पैसा इतका आहे की सामान्य माणूस तो घेण्याचा विचारही करणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news