मलाईकाने अर्जुनसाठी लिहिली ‘बर्थडे नोट’

अर्जन
अर्जन
Published on
Updated on

मुंबई ः बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आज वाढदिवस आहे. हा अभिनेता सध्या मैत्रीण मलाईका अरोरासोबत जगातील सर्वाधिक रोमँटिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पॅरिसमध्ये आपला वाढदिवस करत आहे. मलाईकाने या बर्थ-डे सेलिब्रेशनची काही छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

मलाईकाने शेअर केलेल्या या व्हिडीओत अर्जुन कपूर आपला वाढदिवस एखाद्या हॉटेलमध्ये साजरा करत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओ व छायाचित्रासोबत कॅप्शनमध्ये मलाईकाने लिहिले आहे की, 'ईश्‍वर आपली सर्व स्वप्ने आणि मनोकामना पूर्ण करू देत. हॅप्पी बर्थ डे अर्जुन.' बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनीही अर्जुन कपूरला बर्थडे विश केले आहे. यामध्ये चंकी पांडे, करिश्मा कपूर, कॅटरिना कैफ, जान्हवी कपूर व फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचाही समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news