सुपरनोवा स्फोटानंतरही मृत तारा झाला जिवंत

सुपरनोवा
सुपरनोवा
Published on
Updated on

वॉशिंग्टन : एखाद्या तार्‍याच्या जीवनचक्रामध्ये 'सुपरनोवा' ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण असते. खरे तर सुपरनोवा म्हणजे तार्‍याच्या मृत्यूचे संकेतच असतात; पण सुपरनोवानंतर कायमस्वरूपी तारे नष्ट होतातच असे नाही. 'थरमोन्यूक्‍लियर सुपरनोवा' हे खासकरून पांढर्‍या बटू तार्‍यांना नष्ट करू शकतात. आतापर्यंतच्या अभ्यासात तरी हेच स्पष्ट झाले आहे. मात्र, 'हबल' स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने पाहण्यात आलेला एक तारा हा सुपरनोवानंतरही जिवंत असून, तो पहिल्यापेक्षाही अधिक चमकदार बनला आहे.

सांता बारबाराची कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी आणि लास कॅम्बर्स वेधशाळेचे संशोधक व या संशोधनाचे प्रमुख लेखक कर्टिस मॅककली आणि त्यांच्या पथकाने हे संशोधन केले आहे. या पथकाने 'थरमोन्यूक्‍लियर सुपरनोवा एसएन 2012 झेड्' याचे अवलोकन केले असता ते आश्‍चर्यचकित झाले. यामध्ये असे आढळून आले की, सुपरनोवाच्या शक्‍तिशाली स्फोटानंतरही एक तारा जिवंत असून, तो अधिक प्रखर प्रकाशमान बनला आहे. हे महत्त्वपूर्ण संशोधन 'अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, या अवलोकनातून ब्रह्मांडामध्ये होणार्‍या रहस्यमयी स्फोटांच्या उत्पत्तीसंदर्भात नवी आणि उपयुक्‍त माहिती मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान, सन 1998 मध्ये केलेल्या संशोधनानुसार ब्रह्माडांचा प्रचंड वेगाने विस्तार होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news