Ranbir : जेव्हा जावयाची गळाभेट घेऊन रडू लागले महेश भट्ट

mahesh bhatt and ranbir kapoor
mahesh bhatt and ranbir kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

रणबीर कपूर-आलिया भट्टच्या लग्नानंतर फॅन्ससोबतच इंडस्ट्रीतील लोक खूप खुश आहेत. त्यांचे लग्नातील खूप सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, यापैकी एक फोटो खूप भावूक करणारी आहे. लेकीची चिंता लागून राहिलेल्या बापाच्या चेहऱ्यावरील भाव या फोटोच्या माध्यमातून टिपला गेलाय. हा फोटो आहे-आलिया भट्टचे वडील, दिग्दर्शक महेश भट्ट यांचा.

महेश भट्ट यांनी त्यांचा जावई रणबीर कपूरची गळाभेट घेतली. यावेळी कॅमेरापर्सनने बापाला लेकीची लागून राहिलेली चिंता आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहे. महेश भट्ट्‌ यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसतेय. ते भावूक झालेले दिसताहेत. रणबीर कपूरच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. जणू, तुम्ही काळजी करू नका, असे भाव रणबीरच्या चेहऱ्यावर दिसताहेत.

हा फोटो आलिया भट्टची बहीण आणि अभिनेत्री पूजा भट्टने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोला खूप सारे लाईक्स मिळताहेत. तसेच हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये खूपचं सुंदर कॅप्शन लिहिलीय. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय-'जेव्हा मनाने ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता असेल तर शब्दांची गरज कुणाला आहे.' पहिल्या फोटोमध्ये महेश भट्ट् भावूक झालेले दिसताहेत.

याशिवाय, दुसऱ्या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. सासरा आणि जावयाच्या या सुंदर फोटोंनाही खूप पसंती दिली जात आहे. याशिवाय आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनीही आपल्या मुलीसाठी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये सोनीने आपल्या मुलीला खूप आशीर्वाद दिले आहेत आणि रणबीर कपूरचे मुलासारखे स्वागत केले आहे. सोनीने तिच्या इंस्टाग्रामवर दोघांचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे, जेव्हा तुम्ही तुमची मुलगी गमावता, तेव्हा मुलगा मिळतो. मीदेखील म्हणते की, आम्ही एक शानदार मुलगा मिळवलाय. एक प्रेमळ परिवार'.

सोनी राजदान पुढे लिहितात-'माझी प्रेमळ सुंदरबेबी गर्ल नेहमी आमच्यासोबत आहे. रणबीर-आलिया मी तुमच्यासाठी खूप सारं प्रेम, प्रकाश आणि आनंदासाठी प्रार्थना करते. तुझी प्रेमळ आई.'

सोनी राजदान यांच्या या पोस्टवर अनेक सेलेब्सनीदेखील कमेंट्स करून परिवार आणि कपलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja B (@poojab1972)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news