खुनाच्या दोन घटनांनी पिंपरी – चिंचवड हादरले | पुढारी

खुनाच्या दोन घटनांनी पिंपरी - चिंचवड हादरले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी – चिंचवड शहरात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा निर्घृण खून झाल्याचे समोर आले आहे. रावेत आणि चिंचवड परिसरात आज सकाळी या दोन्ही घटना उघडकीस आल्या आहेत. ऋषीपाल यादव (५०, रा. रावेत) आणि सोमनाथ कलापुरे (रा. पिंपरी) अशी खून झालेल्यांची नावे आहेत.

अमरावती : पेव्हिंग ब्लॉक डोक्यावर मारून वेटरची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीपाल यादव हे सुरक्षारक्षक आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री किवळे येथे अज्ञात इसमांनी दगडाने ठेचून त्यांचा खून केला. रावेत पोलिस तपास करीत आहेत.

कोल्हापूर : अण्णांच्या माघारी कोल्हापूरची जनता त्यांचे स्वप्न पूर्ण करेल, जयश्री जाधव झाल्या भावूक

दुसऱ्या घटनेत सोमनाथ कलापुरे आणि संशयित आरोपी दीपक यादव यांचा नेहरूनगर, पिंपरी येथे किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून यादव याने कलापुरे यांचा चाकूने भोसकून खून केला. या घटनेचा तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

Back to top button