Ranbir Kapoor-Alia Bhatt : कपूरांची ‘ही’ अट आलिया पाळणार? | पुढारी

Ranbir Kapoor-Alia Bhatt : कपूरांची ‘ही’ अट आलिया पाळणार?

पुढारी ऑनलाईन :  कपूर कुलोत्पन्‍न रणबीर याच्याशी विवाह करून आता आलिया भट्टने नव्या जीवनाला सुरुवात केली आहे. अतिशय गुणी अभिनेत्री असलेल्या आलियाने कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच लग्‍न करून संसार थाटण्याचा निर्णय घेतला. ती आता कपूर घराण्याची सूनबाई बनली आहे.

तिच्यापूर्वी गीता बाली, बबिता शिवदासानी, नितू सिंग, जेनिफर कँडल यांच्यासारख्या अभिनेत्रींनी सूनबाई म्हणून कपूर घराण्यात प्रवेश केला होता. मात्र, यापैकी अनेकींनी (सर्वच अभिनेत्रींनी नव्हे!) कपूर घराण्याच्या प्रथेनुसार करिअरमध्ये सुवर्णकाळ सुरू असतानाही चित्रपटात काम करणे सोडले होते.

कुटुंबातील लेकी-सूनांनी चित्रपटात काम करू नये, असे राज कपूर यांना वाटे. त्यामुळे कपूरांची नवी सून आलिया ही प्रथा पाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थात सप्‍तपदी घेत असताना प्रत्येक गोष्ट नवर्‍याला विचारूनच करणार ही शपथ आलियाने वडिलांच्या सल्ल्यानुसार घेतली नाही हे इथे उल्‍लेखनीय आहे!

Back to top button