कोल्हापूर : औरंगजेबाच्या वंशजांचे पोस्टर्स लावल्याने तरूणांचा बिर्याणी हाऊसमध्ये राडा

कोल्हापूर : औरंगजेबाच्या वंशजांचे पोस्टर्स लावल्याने तरूणांचा बिर्याणी हाऊसमध्ये राडा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूरातील एका बिर्याणी हाऊसमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही तरुण जेवणासाठी बिर्याणी हाऊसमध्ये गेले असता, तेथील भितींवर औरंगजेबाच्या वंशजांचे पोस्टर्स पाहताच त्यांनी बिर्याणी हाऊसमध्ये तोडफोड करण्यास सुरूवात केली. सदर प्रकार हा कोल्हापूरमधील राजारामपुरी ७ वी गल्लीत घडला आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापूरातील शिवसेनेचे नेते रविकिरण इंगवले यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर त्यांनी हॉटेल मालकाला या घटनेचा जाब विचारला. यानंतर हॉटेल मालकांनी औरंगजेब किंवा त्याच्या वंशजाचे हॉटेलमध्ये असणारे फोटो काढण्याचे आश्वासन शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्यांना दिले आहे.

या घटनेवर बोलताना ठाकरे गटाचे नेते इंगवले म्हणाले, हे शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचे हे शहर आहे. या शहरात सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे शहारत जातीय तेट निर्माण न करता, शांतता ठेवणे ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. ज्यांनी आपल्यावर इतके वर्ष राज्य केले त्यांच्या वंशजांचे फोटो लावतातच कसे असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. हे फोटो हटवले नाहीत तर, शहरात हॉटेलचे नावच शिल्लक ठेवणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच शहरात असा प्रकार घडल्यास आमच्या कार्यकर्त्यांना कळवण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news