कोल्हापूर : जिल्ह्यात आजपासून गोवर लसीकरण मोहीम | पुढारी

कोल्हापूर : जिल्ह्यात आजपासून गोवर लसीकरण मोहीम

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात गोवर प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्या बालकांसाठी 25 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार्‍या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेस गुरुवार (दि.15) पासून प्रारंभ करण्यात येणार आहे. मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिल्या आहेत.

गोवर हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याचा झपाट्याने प्रसार होऊ शकतो. ज्या भागातील मुलांनी गोवर प्रतिबंधात्मक लस घेतली नाही, अशांमध्येच प्रामुख्याने हा आजार दिसून आल्यामुळे अद्याप लस न घेतलेल्या बालकांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांनी गोवरची लस टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

जिल्ह्यातील 142 बालकांनी अद्याप पहिला डोस, तर 159 बालकांनी डोसच घेतलेले नाहीत. 9 ते 12 महिन्यांच्या कालावधीतील बालकांना पहिला डोस व 16 ते 24 महिन्यांच्या बालकांना दुसरा डोस देण्याचे नियोजन केले आहे. हातकणंगले तालुक्यात डोस न घेतलेल्या बालकांची संख्या सर्वाधिक आहे. त्या पाठोपाठ शिरोळ तालुक्याचा क्रमांक लागतो.

Back to top button