कोल्हापूर : नाताळसाठी बाजारपेठा सजल्या | पुढारी

कोल्हापूर : नाताळसाठी बाजारपेठा सजल्या

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  ख्रिश्चन धर्मीयांचा पवित्र सण असणार्‍या नाताळ सणासाठी शहरातील मुख्य बाजारपेठा सजल्या आहेत. ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी पताका यासह सांताक्लॉजचे कपडे आणि वस्तू खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. विविध मॉलसह दुकानांमध्ये नाताळ सणासाठी आवश्यक वस्तूंची रेलचेल बघायला मिळत आहे.

शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील दुकानांत वस्तूंची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. होली रीट, बेल्स, प्रभू येशू आणि मेरी यांच्या मूर्ती, सांताक्लॉजचे कपडे, चांदणी, खेळणी, सांताक्लॉजचा मुखवटा, ख्रिसमस बॉल्स, ट्री आणि टोप्या खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होत असल्याचे चित्र बाजारात आहे. कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नाताळ सणाचे सेलिब—ेशन होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह संचारला आहे. सांताक्लॉजचे मुखवटे, टोप्या खरेदीकडे विद्यार्थ्यांचा कल असून लाल आणि पांढर्‍या रंगरंगतीच्या सांताक्लॉजच्या पेहरावाला अधिक मागणी आहे. ख्रिसमस ट्रीसह विविध गोष्टी ग्राहक खरेदी करताना दिसत आहेत.

आकर्षक भेटवस्तूंनी बाजार फुलला

यावर्षी बाजारात विविध प्रकारची सजावट साहित्य पाहायला मिळत आहे. ख्रिसमस ट्री, स्टारबेल, कपडे, टोप्या, वेगवेगळे स्टॅच्यू, गव्हाणी, येशूचे पोस्टर्स, टॅगिंग बेल, रंगीबेरंगी बॉल, कागदी तसेच मेटल स्टार, मेरी ख्रिसमस व हॅप्पी न्यू इयरचे बॅनर्स वॉल स्टिकर्स आकर्षक लायटिंग, फुगे, कंदील, प्रभू येशू आणि मेरीची मूर्ती इत्यादी साहित्य बाजारात उपलब्ध आहे.

Back to top button