पुढारी ऑनलाईन डेस्क : अश्लिल व्हायरल व्हिडिओ प्रकरणी राजस्थान पोलिस सेवेतील डीएसपी हिरालाल सैनी याला अटक करण्यात आली होती. कोर्टाने १७ सप्टेंबर पर्यंत सैनीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याचा एका महिला पोलिस कॉन्स्टेबल सोबत स्विमिंग पूलमध्ये अश्लिल कृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
डीएसपी सैनीला निलंबीत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी याला मंजुरी दिली आहे. गृह विभागाने सैनीला निलंबित करण्यासंबंधीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. यानंतर त्यांनी मंजुरी दिली. मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर गृह विभागाने ही फाईल कार्मिक विभागाकडे पाठवली.
डीएसपी हीरालाल सैनी यांना पोलिसांनी उदयपूरमधील एका रिसॉर्ट मधून अटक केली आहे. राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने रिसॉर्टवरती छापा टाकून अटक केली. या रिसॉर्टमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत डीएसपी एकत्र राहिले होते. त्यांच्यासोबत एक लहान मुलगाही होता.
या प्रकरणात, एक प्रभारी ठाणे अंमलदाराला अटक केली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला कॉन्स्टेबलचा पती नागौर चितवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. पण एफआयआर नोंदवला गेला नाही, कारण हे प्रकरण डीएसपीशी संबंधित होते. यामुळे ठाणे अंमलदार प्रकाशचंद मीना यांना अटक केली होती.
महिला कॉन्स्टेबलने १३ जुलै २०२१ रोजी जलतरण तलावातील काही व्हिडिओ आपल्या व्हॉट्स अॅपवर स्टेटस ठेवले होते. यात महिलेचे ६ वर्षाचा मुलगाही दिसत आहे. नंतर काही वेळात दुसरा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात लिहिल होत पार्ट टु. हा व्हिडिओ २ मीनिट ३८ सेकंदाचा आहे. यात डीएसपी हीरालाल सैनी आमि महिला कॉन्स्टेबल दिसत आहेत. यावेळी कॉन्स्टेबलचा ६ वर्षाचा मुलगाही आहे. राज्य बाल संरक्षण आयोगाने देखील अश्लील व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलाची दखल घेतली होती.