India Or Bharat : …तर पाकिस्तान करु शकतो ‘इंडिया’ नावावर दावा!

India Or Bharat : …तर पाकिस्तान करु शकतो ‘इंडिया’ नावावर दावा!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभती भवनातून आलेल्या अधिकृत निमंत्रण पत्रिकेवर "प्रेसिडेंट ऑफ इंडिया" ऐवजी "प्रेसिडेंट ऑफ भारत" असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून देशातील राजकारण तापले आहे. नामांतराच्‍या मुद्यावर  विरोधी आघाडीतील अनेक पक्ष आक्रमक झाले असून, यावर संमिश्र प्रतिक्रिया विविध क्षेत्रातून व्‍यक्‍त हाेत आहेत. तर पाकिस्तानच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी असे म्हटले आहे की संयुक्त राष्ट्रात 'इंडिया' या नावाची मान्यता अधिकृतपणे रद्द झाल्यास पाकिस्तान  'इंडिया' नावावर दावा करू शकतो, असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांतून व्हायरल होत आहे.

India Or Bharat : काय आहे प्रकरण

दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 बैठकीपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परदेशी पाहुण्यांना पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेवरुन वाद निर्माण झाला आहे. या  निमंत्रण पत्रिकेवर  'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'भारताचे राष्ट्रपती' वापरण्यात आले आहे. ही निमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकार भारतीय राज्यघटनेतून India हा शब्द काढून टाकण्यासाठी विधेयक मंजूर करू शकते, अशी शक्यता बांधली जात आहे. भारतीय राज्यघटनेतून 'इंडिया' हा शब्द काढून टाकला तर पाकिस्तान त्या नावावर दावा करु शकते. पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्रात इंडिया या नावाची मान्यता अधिकृतपणे रद्द झाल्यास पाकिस्तान इंडिया या नावावर दावा करू शकते. भारतामध्ये सुरू असलेल्या चर्चेकडे आता पाकिस्तानचे लक्ष लागले आहे.

India Or Bharat : पाकिस्तान कसा काय India वर दावा करू शकतो

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारताने जर इंडिया हे नाव रद्द केले आणि संयुक्त राष्ट्राच्या यादीतून भारतासाठी इंडिया हे नाव रद्द झाले तर पाकिस्तान India या नावावर दावा करू शकतो. याचे कारण देताना पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे, की India हे नाव इंदू नदी म्हणजेच सिंधू नदी वरून पडले आहे. Indus Valley Civilisation वरून पाश्चिमात्य राष्ट्रांनी India हे नाव प्रचलित केले आहे. मात्र ती सिंधू नदी ही आता पाकिस्तानात आहे. त्यामुळे पाकिस्तान India नावावर दावा ठोकू शकते, असे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे.

India Or Bharat :  विरोधकांचा आक्षेप

सध्या भारत आणि इंडिया या दोन्ही नावावरुन वाद सुरु आहे. विरोधकांकडून 'भारताचे राष्ट्रपती' लिहिण्यावर आक्षेप व्यक्त केला जात आहे. मोदी सरकार विरोधी आघाडीच्या 'इंडिया'ला घाबरले आहे आणि त्यामुळे देशाचे नाव बदलण्याबाबत बोलत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटलं आहे,"पंतप्रधान मोदी हे सतत इतिहासाचे विकृतीकरण करत आहेत. जो भारत अनेक राज्यांचा संघ आहे. त्याला विभाजित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे; पण आम्ही खचून जाणार नाही. शेवटी इंडिया आघाडीतील पक्षांचे उद्दीष्ट हे 'भारतात सौहार्द, सलोखा आणि विश्वास आणणे हाच आमचा प्रयत्न आहे"

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news