Bharat vs Team India : टीम इंडियाचे नाव बदला, ‘भारत’ नावाने संघ खेळवा : दिग्गज क्रिकेटरची BCCIकडे मागणी

Bharat vs Team India : टीम इंडियाचे नाव बदला, ‘भारत’ नावाने संघ खेळवा : दिग्गज क्रिकेटरची BCCIकडे मागणी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : Bharat vs Team India : टीम इंडियाचा (Team India) माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) बीसीसीआयकडे (BCCI) एक आश्चर्यकारक मागणी केली आहे. सेहवागने बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांना पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचे (Team India) नाव बदलण्याचे आवाहन केले आहे.

सेहवाग (Virendra Sehwag) म्हणाला की, टीम इंडिया ऐवजी आपला संघ भारत (Bharat) या नावाने मैदानात उतरला पाहिजे. सेहवागने ट्विटमध्ये म्हटलंय की, माझा नेहमीच विश्वास आहे की नाव असे असावे की ते आपल्यामध्ये अभिमान जागृत करेल. आपण भारतीय आहोत आणि इंडिया (India) हे नाव ब्रिटिशांनी दिले आहे. त्यामुळे टीम इंडियाचे नावही बदलायला हवे. सेहवागने ट्विटरवर जय शहा यांना टॅग करत वर्ल्डकपमध्ये आपल्या खेळाडूंच्या टी-शर्टवर भारत लिहिण्याची मागणी केली आहे. (Bharat vs Team India)

वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) हे ट्विट देशाचे अधिकृत नाव लवकरच बदलून भारत (Bharat) केले जाऊ शकते अशा बातम्या येऊ लागल्यानंतर केले. देशाचे नाव इंग्रजीतही भारत असेच लिहिले जाईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. नेपाळविरुद्धच्या सामन्यादरम्यानही सेहवागने इंडिया vs नेपाळ ऐवजी भारत vs नेपाळ (#Bharat vs Nepal) हा हॅशटॅग वापरला होता. (Bharat vs Team India)

'या' आंतरराष्ट्रीय संघाच्या नावात झालाय बदल

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे नाव बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी नेदरलँड संघाचे नाव बदलण्यात आले आहे. पूर्वी हा संघ हॉलंडच्या नावाने खेळत असे, परंतु 1 जानेवारी 2020 रोजी या देशाने आपले अधिकृत नाव बदलून नेदरलँड असे केले. सेहवागने नेदरलँडचेही उदाहरण दिले आहे. 1996 च्या विश्वचषकात हॉलंड या नावाने नेदरलँडचा संघ खेळायला आला होता, असे ट्विट सेहवागने केले आहे. पण 2003 मध्ये हा संघ नेदरलँड या नावाने खेळला आणि आजही त्याच नावाने ओळखला जातो. बर्मानेही आपले नाव बदलून म्यानमार केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news