पालघर; पुढारी वृत्तसेवा : अहमदाबाद येथे १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान (IND vs PAK) क्रिकेट सामन्यासाठी मुंबई सेंट्रल या पश्चिम रेल्वे मार्गावरून स्पेशल ट्रेन रवाना होणार आहे. पश्चिम रेल्वेने क्रिकेटप्रेमींसाठी आयोजित केलेली एक खास पर्वणीच म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
संबंधित बातम्या :
पश्चिम रेल्वेने स्पेशल ट्रेन उद्या (दि.१३) मुंबई सेंट्रल ते अहमदाबादपर्यंत ट्रेन सोडण्याचे घोषित केले होते. 09013 MMCT – ADI SF SPL ही गाडी १३ ऑक्टोबर रोजी पालघर रेल्वे स्टेशनवर रात्री ११.०५ या वेळेस येणार आहे व ती अहमदाबाद येथे सकाळी ५.३० वाजता पोहोचणार आहे. तसेच परतीसाठी ही गाडी अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरून १५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता मुंबई सेंट्रलसाठी माघारी फिरणार असून ती पालघर येथे सकाळी १०.१३ वाजता पोहोचणार आहे. क्रिकेटप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल विभाग डीआरयूसीसी सदस्य व शिवसेनेचे महाराष्ट्राचे प्रवक्ते केदार काळे यांनी केले आहे. (IND vs PAK)
दरम्यान, पालघर जिल्हा मुख्यालय येथे प्रवासी संख्या वाढत असून लांब पल्ल्याच्या गाड्यांना पालघर स्थानकात थांबे द्यावे, अशी मागणी भाजप रेल प्रकोष्ठ कैलाशजी वर्मा यांनी रेल्वे अधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबई अहमदाबाद विशेष गाडीला पालघर स्थानकात थांबा दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :