वन-डे वर्ल्डकपमध्ये ‘हिटमॅन रोहित’चं शतकांचा बादशहा; सचिनचा विक्रम काढला मोडीत | पुढारी

वन-डे वर्ल्डकपमध्ये 'हिटमॅन रोहित'चं शतकांचा बादशहा; सचिनचा विक्रम काढला मोडीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिटमॅन रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. रोहित विश्वचषक स्पर्धेत एकूण ७ शतके लगावले आहेत. यापूर्वी रोहित आणि सचिनच्या नावावर ६ शतकांची नोंद होती. रोहितने अफगाणिस्तान विरोधात ७ वे शतक ठोकत सचिनला मागे टाकले आहे.

‘हिटमॅन रोहित’ ठरला सिक्सर किंग; ‘या’ फलंदाजाला टाकले मागे

वन-डे विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम रोहित शर्माने आपल्या नावावर केला आहे. त्याने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली. त्याने विश्वचषक स्पर्धेत ५५४ षटकार लगावत हा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज क्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. ख्रिस गेलने विश्वचषक स्पर्धेत ५५३ षटकार लगावले होते. दरम्यान हिटमॅन रोहित शर्माने क्रिस गेलचा विक्रम मोडित काढला आहे. (Rohit Sharma New Record)

अफगाणिस्तान विरोधात शतकी खेळी

विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला भोपळाही न फोडता माघारी जावे लागले होते. दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या आणि विश्वचषकातील भारताच्या दुसऱ्या सामन्यात रोहितने शतकी खेळी केली आहे. त्याने ६३  चेंडूमध्ये आपले शतक पूर्ण केले आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button