Shubman Gill
Shubman Gill

Shubman Gill Discharged : शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज; IND vs PAK सामना खेळणार?

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय फलंदाज शुभमन गिल याला रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. डेंग्यूचे निदान झाल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, डेंग्यू झाल्यामुळे वन-डे विश्वचषकातील सुरुवातीचे दोन सामने त्याला खेळता येऊ शकले नाहीत. मात्र, आता डिस्जार्ज मिळाल्यानंतर तो पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबतचे वृत्त 'हिंदूस्तान टाईम्स'ने दिले आहे. यापूर्वी क्रिकबझने त्याला चेन्नईच्या रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त दिले होते. (Shubman Gill Discharged)

शुभमन गिल सध्या बीसीसीआयने नियुक्त केलेल्या डॉ. रिझवान खान यांच्या देखरेखेखाली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. शुबमन गिल गेल्या काही दिवसांपासून चेन्नईच्या टीम हॉटेलमध्ये होता. मात्र त्यांच्या प्लेटलेटची संख्या 70,000 पर्यंत घसरली आणि डेंग्यूच्या रूग्णांच्या बाबतीत, एकदा संख्या 100,000 पेक्षा कमी झाली की, तुम्हाला वैद्यकीय सुविधेत दाखल केले जाते. एक खबरदारीचा उपाय म्हणून सर्व अनिवार्य चाचण्यांसाठी दाखल करण्यात येते. (Shubman Gill Discharged)

शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळू शकतो का? (Shubman Gill Discharged)

शुभमन गिलला डिस्चार्ज देण्यात आला असला तरी १४ ऑक्टोबर रोजी होणार्‍या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकेल का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. भारत वि. पाक हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दरम्यान पाक विरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली नाही, तर त्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात संधी मिळू शकते. (Shubman Gill Discharged)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news