Virat Kohli-Naveen-Ul-Haq : काय सांगता? विराट कोहली-नवीन उल हक यांच्यातील वाद मिटला! | पुढारी

Virat Kohli-Naveen-Ul-Haq : काय सांगता? विराट कोहली-नवीन उल हक यांच्यातील वाद मिटला!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यादरम्यान एक दृश्य पाहायला मिळाले, ज्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सामन्यादरम्यान नवीन उल हक आणि विराट कोहलीने एकमेकांना मिठी मारताना दिसले. विराट आणि नवीनचा हा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Virat Kohli-Naveen-Ul-Haq)

कोहलीने जेव्हा नवीनला मिठी मारली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. दिल्ली स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी हे दृश्य पाहिले आणि चाहत्यांनी जल्लोष सुरू केला. विराट आणि नवीनच्या आज मिठीमुळे आयपीएलमधील वाद मिटला असल्याचे बोलले जात आहे.  आयपीएल 2023 दरम्यान कोहली आणि नवीन यांच्यात मोठा वाद झाला होता. आयपीएलमध्ये झालेल्या कोहली आणि नवीन यांच्यातील वादात गौतम गंभीरनेही उडी घेतली होती, त्यावर बरीच टीका झाली. (Virat Kohli-Naveen-Ul-Haq)

भारत वि. अफगाणिस्तान सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने जोरदार फटकेबाजी करत शतकी खेळी केली. त्याने १३१ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. रोहितने वनडे विश्वचषकातील सातवे शतक पूर्ण केले. रोहित वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. रोहितने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सचिनने ६ शतके झळकावली होती. त्याचबरोबर एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद १००० धावा करणाारा भारतीय फलंदाज बनण्यातही रोहितला यश आले आहे. (Virat Kohli-Naveen-Ul-Haq)

हेही वाचलंत का?

Back to top button