IND vs AFG : अफगाणिस्तानवर भारताचा मोठा विजय | पुढारी

IND vs AFG : अफगाणिस्तानवर भारताचा मोठा विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : वन-डे वर्ल्डकपमध्ये भारतानेआपल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा आठ विकेट्सने पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० ओव्हरमध्ये 8 गडी गमावून २७२ धावा केल्या. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने ८० धावांची तर अजमतुल्ला उमरझाईने ६२ धावांची खेळी खेळली. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने शतकी (१३१),तर विराट कोहलीने केलेल्या अर्धशतकी (५५) खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने हा सामना ३५ ओव्हरमध्ये दोन गमावत जिंकला. (IND vs AFG)

आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने ८४ बॉलमध्ये १६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १३१ धावांची खेळी केली. तर विराट कोहली ५६ बॉलमध्ये ५५ धावा करून नाबाद राहिला. त्याने ३५व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. विराटचे वनडे कारकिर्दीतील हे ६८ वे अर्धशतक आहे. तर त्याचे हे स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक ठरले. सामन्यात इशान किशनने ४७  (४७) धावांचे योगदान दिले. (IND vs AFG )

सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजीनी निराशा केली. राशिद खान व्यतिरिक्त एकाही गोलंदाजाला भारतीय फलंदाजांना बाद करता आले नाही. राशिदने  प्रथम इशान किशनला झद्रान करवी झेलबाद केले. तर शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा आपल्या फिरकीत फसवून क्लीन बोल्ड केले.

अफगाणिस्तानची फलंदाजी

वन-डे ( एकदिवसीय) विश्‍वचषक स्‍पर्धेत आज ( दि. 11 ) भारताची लढत अफगाणिस्तानविरुद्ध होत आहे. अफगाणिस्तान  नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला आहे. ( IND Vs AFG ODI WC )  शाहिदी ( ८८ चेंडूत ८०), उमरजाई ( ६९ चेंडूत ६२) यांच्‍या दमदार फलंदाजीच्‍या जाेरावर अफगाणिस्तानने ५० ओव्हरमध्ये ८ गडी गमावत २७२ धावा केल्‍या आहेत.

अफगाणिस्‍तानने आपल्‍या डावाची सावध सुरुवात केली. सहा ओव्हरमध्ये विनाबाद २८ धावा केल्‍या. सातव्‍या ओव्हरमध्ये सलामीवीर इब्राहिम झद्रानला वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराहने यष्‍टीरक्षक केएल राहुल करवी झेलबाद केले.  त्‍याने २८ बॉलमध्ये २२ धावा केल्‍या. यामध्‍ये चार चाैकारांचा समावेश हाेता.सामन्याच्या १३ व्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला दुसरा धक्का बसला. भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने गुरबाजला शार्दुल ठाकूर करवी झेलबाद केले. गुरबाजने आपल्या खेळीत २८ बॉलमध्ये २१ धावा केल्या.

‘हिटमॅन रोहित’ ठरला सिक्सर किंग

वन-डे वर्ल्डकपस्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम रोहित शर्माने आपल्या नावावर केला आहे. त्याने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली. त्याने वन-डे वर्ल्डकप स्पर्धेत ५५४ षटकार लगावत हा विक्रम आपल्या नावे केला. त्याने वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. ख्रिस गेलने स्पर्धेत ५५३ षटकार लगावले होते. दरम्यान हिटमॅन रोहित शर्माने क्रिस गेलचा विक्रम मोडित काढला आहे.

वन-डे वर्ल्डकपमध्ये ‘हिटमॅन रोहित’च शतकांचा बादशहा

हिटमॅन रोहित शर्माने वन-डे वर्ल्डकप स्पर्धेत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने स्पर्धेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. रोहित विश्वचषक स्पर्धेत एकूण ७ शतके लगावले आहेत. यापूर्वी रोहित आणि सचिनच्या नावावर ६ शतकांची नोंद होती. रोहितने अफगाणिस्तान विरोधात ७ वे शतक ठोकत सचिनला मागे टाकले आहे.

हेही वाचा : 

Back to top button