पुढारी ऑनलाईन : रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कपमध्ये रविवारी सलग पाचवा विजय नोंदवला. यामुळे टीम इंडियाने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. टीम इंडियाने रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा ४ विकेट्सनी पराभव केला. तब्बल २० वर्षानंतर टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला हरवण्याची कामगिरी केली आहे. (IND vs NZ World Cup 2023)
या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि चेस मास्टर विरोट कोहली (Virat Kohli) हिरो ठरले. या दोघांनी अनेक विक्रम मोडले. शमी ५ विकेट्स घेऊन प्लेअर ऑफ द मॅच ठरला. तर विराटने ९५ धावांची विजयी खेळी केली. या सामन्यांत ११ विक्रम झाले.
संबंधित बातम्या
पहिला विक्रम म्हणजे वर्ल्ड कपच्या इतिहासात न्यूझीलंडला पॉवरप्लेमध्ये एकही बळी न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा विक्रम रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोडीने मोडला. त्यांनी पॉवरप्लेमध्ये किवी संघाला विकेट्स घेण्याची संधी दिली नाही. रोहित-शुभमन सलामी जोडीने ७१ धावांची भागीदारी केली.
या सामन्यातील दुसरा विक्रम म्हणजे धर्मशाला स्टेडियमवर सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा आहे. या सामन्यात न्यूझीलंडमे २७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४८ षटकांत ६ गडी गमावून हा सामना जिंकला. टीम इंडियामे धर्मशाला स्टेडियमवर सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करून इतिहास रचला. याआधी धर्मशाला येथे २२७ धावांचे लक्ष्य गाठले होते. जानेवारी २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने भारताविरुद्ध ४७.२ षटकांत ३ विकेट्स गमावून लक्ष्य गाठत सामना जिंकला होता.
मोहम्मद शमी- २
कपिव देव- १
वेंकटेश प्रसाद-१
रॉबिन सिंह-१
आशीष नेहरा-१
युवराज सिंग- १
शुभमन गिल- ३८ (डावांत)
हाशिम अमला- ४०
जहीर अब्बास- ४५
केविन पीटरसन- ४५
बाबर आझम- ४५
रासी वॅन डेर डुसेन -४५
वनडेत सर्वांधिक धावा करण्यात विराट कोहलीने जयसूर्याला मागे टाकले आहे. सनथ जयसूर्याच्या वनडेत १३,४३० धावा आहेत. तर विराटने १३,४३७ धावा केल्या आहेत.
सामने- १२
विकेट्स- ३६
सरासरी -१५.०२
स्ट्राईक रेट- १७.६
इकॉनॉमी रेट- ५.०९
झहीर खान- ४४
जवागल श्रीनाथ- ४४
मोहम्मद शमी- ३६
अनिल कुंबळे- ३१
जसप्रीत बुमराह-२९
कपिल देव-२८
वनडे कपमध्ये मोहम्मद शमी शिवाय कोणत्याही भारतीय गोलंदाजाने २ हून अधिक वेळा ४ विकेट्स घेतलेल्या नाहीत.
मिचेल स्टार्क- ६
इम्रान ताहीर- ५
मोहम्मद शमी-५
डेरेल मिशेलने १२७ चेंडूत १३० धावांची शतकी खेळी केली. डेरेल मिशेल हा भारताविरुद्ध शतक करणारा न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज आहे. याआधी न्यूझीलंडच्या ग्लेन टर्नरने १९७५ मध्ये मँचेस्टर येथील सामन्यात नाबाद ११४ धावा केल्या होत्या.
१४५ *(धावा)- टॉम लॅथम, ऑकलँड, २०२२
१४०- मिचेल ब्रेसवेल, हैदराबाद, २०२३
१३८- डेव्हॉन कॉन्वे, इंदूर, २०२३
१३०- डेरेल मिशेल, धर्मशाला, २०२३
१२०- नाथन एस्टल, राजकोट, १९९९
सचिन तेंडूलकल -२१
कुमार संगकारा-१२
शाकिब अल हसन-१२
विराट कोहली-१२
रोहित शर्माने २०२३ मध्ये त्याच्या २०व्या एकदिवसीय डावांत ५० वा षटकार मारला. रोहित शर्मा एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. (IND vs NZ World Cup 2023)
एबी डिविलियर्स (२०२५)- ५८ षटकांर
ख्रिस गेल (२०१९)-५६ षटकांर
रोहित शर्मा (२०२३)- ५०* षटकांर
शाहिद आफ्रिदी (२००२)- ४८ षटकांर
मोहम्मद वसीम (२०२३)- ४७ षटकांर
हे ही वाचा :