Cheteshwar Pujara On Virat : ‘शतकापेक्षा संघाचा जलद गतीने विजय महत्वाचा’, चेतेश्वर पुजाराने विराटला सुनावले | पुढारी

Cheteshwar Pujara On Virat : 'शतकापेक्षा संघाचा जलद गतीने विजय महत्वाचा', चेतेश्वर पुजाराने विराटला सुनावले

पुढारी ऑनलाईन डेस्क : कसोटी क्रिकेटमधील भारताचा दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजारा याने विराटच्या बहुचर्चित वनडेतील ४८ व्या शतकावर आपले मत मांडले आहे. पुण्यात विश्वचषक २०२३ मधील भारत विरुद्ध बांगलादेश सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने बांगलादेश नमवत विश्वचषकातील चौथा विजय मिळवला. भारत बांगलादेशच्या २५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. विराट कोहली आणि केएल राहुल क्रिजवर होते. तेव्हा विराट कोहलीचे शतक पूर्ण व्हावे, यासाठी २ एकेरी घेणे टाळले. विराटच्या या कृतीवर चेतेश्वर पुजाराने टीका केली आहे. (Cheteshwar Pujara On Virat)

“विराट कोहलीचे शतक पूर्ण व्हावे अशी माझीही इच्छा होती. पण खेळ लवकरात लवकर संपवायचा आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तुमच्या संघाचा रनरेट सर्वांत चांगला असावा. तुम्ही सध्या रनरेटसाठी लढत आहात. पुढे मागे वळून पाहताना ‘आपण ते करु शकलो असतो’ असे आपण म्हणू इच्छित नाही” असे मत चेतेश्वर पुजाराने मांडले आहे. (Cheteshwar Pujara On Virat)

सोशल मीडियावरील चाहत्यांच्या एका वर्गाने विराट कोहली आणि KL राहुल यांच्या भागीदारीदरम्यान एकेरी नाकारण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कारण त्याने शेवटच्या ३० धावा ठोकल्या. विराट कोहलीने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारताच्या २५७ धावांच्या शेवटच्या २१ चेंडूंमध्ये ८ डॉट बॉल खेळले. (Cheteshwar Pujara On Virat)

हेही वाचलंत का?

 

Back to top button