World Cup 2023 | सूर्यकुमारचे बलिदान की विराट कोहलीची चूक! चाहत्यांनी कोणाला दिला दोष?

World Cup 2023 | सूर्यकुमारचे बलिदान की विराट कोहलीची चूक! चाहत्यांनी कोणाला दिला दोष?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जहाँ मॅटर बडे.. वहॉ विराट खडे..! ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीच्या कौतुकासाठी केलेले हे ट्विट रविवारी पुन्हा एकदा खरे ठरले. विश्वचषकात सलग चार सामने जिंकणार्‍या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचे धुरंधर एका बाजूने बाद होत असताना विराट कोहली पहाडासारखा दुसर्‍या बाजूला उभा राहिला. त्याने विजयाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर पेलली. भारताला विश्वचषकात न्यूझीलंडवर २० वर्षांनंतर पहिला विजय मिळाला. मात्र, या सामन्यात विराटच्या चुकीमुळे सूर्यकुमार यादवला धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. कोहलीने धाव घेण्यास नकार दिल्याने सूर्या अत्यंत वाईट धावबादचा बळी ठरला. यानंतर सोशल मीडियावर अनेक चाहते विराट कोहलीला दोष देत आहेत.

संबंधित बातम्या :

कोहलीच्या चुकीमुळे सूर्या बाद झाला?

सूर्यकुमार यादवला रविवारी (दि. २२) धर्मशाळाच्या सुंदर व्ह्यू असलेल्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धचा पहिला विश्वचषक सामना खेळण्याची संधी मिळाली. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे हार्दिक पांड्या सामन्यातून बाहेर पडल्यानंतर त्याला संघात घेण्यात आले. सूर्यकुमार चमकदार कामगिरी करण्यासाठी आतुर झाला असताना स्वस्तात धावबाद झाल्याने त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

सूर्यकुमारने ३४ व्या षटकातील पाचवा चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळला आणि धावा काढण्यासाठी धावला. विराटनेही सूर्याच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि तोही क्रीझच्या खूप पुढे गेला. मात्र, सँटनरने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत चेंडू रोखून गोलंदाजाच्या दिशेने फेकला. तोपर्यंत सूर्याने अर्ध्याहून अधिक क्रीज ओलांडली होती, मात्र विराट सूर्याकडे पाहण्याऐवजी क्षेत्ररक्षकाकडे पाहत होता. कोहली क्रीजच्या पुढे आला, पण सँटनरच्या थ्रोनंतर मागे परताल. बोल्टने लगेच चेंडू पकडला आणि तो कीपरच्या दिशेने फेकला आणि लॅथमने स्टंप उधळले. सूर्या क्रीजपासून दूरच राहिला आणि धावबाद झाल्याने त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. सूर्या केवळ २ धावा करून निघून गेला.

दरम्यान, 'एक्स'वर चाहत्यांनी सूर्यकुमार यादवच्या धावबाद होण्यामध्ये कोणाची चूक होती, यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुर्य कुमार यादवने विराट कोहलीसाठी आपल्या विकेटचे बलिदान दिले, असे एका चाहत्याने म्हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news