पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने आजपर्यंत अनेक विक्रम केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या 'रनमशीन'ने 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून त्याच्या शानदार कारकिर्दीत २६ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान फलंदाज बनला. या सामन्यापूर्वी, कोहलीने ५२० सामन्यांमध्ये ५६६ डावांत २५,९२३ धावा केल्या होत्या. पुण्यात झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात षटकार ठोकून नेत्रदीपक पद्धतीने हा टप्पा गाठला.
संबंधित बातम्या
बांगलादेशचे गोलंदाजी आक्रमण उद्ध्वस्त करून कोहलीने विशेष कामगिरी केली. या डावात 77वी धाव काढून त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील २६हजार धावा (566 वा डाव) पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा आणि जगातील चौथा फलंदाज ठरला.
२६ हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार करणारा कोहली जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. या यादीत भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ६६४ सामन्यांच्या ७८२ डावांमध्ये ३४,४५७, धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर माजी यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा (२८,०१६) आणि तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पाँटिंग (२७,४८३) आहे.
हेही वाचा