Mohammad Shami New Record : मोहम्मद शमीचा धमाका; मोडला ‘या’ दिग्गज गोलंदाजाचा विक्रम | पुढारी

Mohammad Shami New Record : मोहम्मद शमीचा धमाका; मोडला 'या' दिग्गज गोलंदाजाचा विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना धर्मशालाच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरेलल्या न्यूझीलंडने भारतासमोर २७४ धावांचे आव्हान ठेवले आहे. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने शतकी खेळी केली. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने दिग्गज माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचा विक्रम मोडला आहे. (Mohammad Shami New Record)

 २०२३ च्या विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात मोहम्मद शमीने दमदार पुनरागमन केले आहे. त्याने १० षटकांमध्ये ४५ धावा देत ५ विकेट्स पटकावल्या आहेत. शमी विश्वचषकात भारतासाठी तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. अनिल कुंबळे यांनी विश्वचषक स्पर्धेत ३१ बळी घेतले आहेत. मोहम्मद शमीच्या नावावर विश्वचषक स्पर्धेत ३६ बळींची नोंद झाली आहे. शमीने विश्वचषक स्पर्धेत १२ सामने खेळत ३६ विकेट्स पटकावल्या आहेत. (Mohammad Shami New Record)

विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत जहीर खान आणि जवागर श्रीनाथ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी विश्वचषकात प्रत्येकी ४४ विकेट्स पटकावल्या आहेत. या यादीत मोहम्मद शमी ३६ विकेट्स पटकावत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. (Mohammad Shami New Record)

झहीर खान – ४४ विकेट्स

जवागल श्रीनाथ – ४४ विकेट्स

मोहम्मद शमी – ३६ विकेट्स

अनिल कुंबळे – ३१ विकेट्स

हेही वाचलंत का?

Back to top button