Body Shaming : मिस युनिव्हर्स हरनाज संधूला पाहून बणार नाही विश्वास, ३ महिन्यात वाढलं इतकं वजन!

Harnaaz Sandhu
Harnaaz Sandhu

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारताची हरनाज संधू हिने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आणि सगळीकडे तिची चर्चा झाली. ब्युटी विथ ब्रेन असलेल्या चंदीगडच्या हरनाज कौर संधूने मिस युनिव्हर्स २०२१ चा ताज जिंकला. तिच्या सौंदर्यांचे आणि बुद्धीकौशल्याची सगळीकडे चर्चा होत राहिली. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय. विविध कार्यक्रम, फॅशन शो, कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहे. २६ मार्च रोजी लॅक्मे फॅशन शो वीकचा एक भाग म्हणून हरजनने रॅम्प वॉक केला. पण, बदललेली मिस युनिव्हर्स हरनाजने रॅम्पवर पाऊल ठेवताच तिच्या वजनाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या.

Harnaaz Sandhu
Harnaaz Sandhu

हरनाज फॅशन डिझायनर शिवन आणि नरेश यांची शोस्टॉपर होती. स्वत:ला प्रेझेंट करताना लोक तिच्याकडे पाहू लागले.

सोशल मीडियावरही या फॅशन शोमधील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. तिला पाहून लोक हैराण झाले. तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागत आहे. वाढलेल्या वजनामुळे तिला ट्रोलिंगचेही शिकार व्हावे लागले. तिच्या वाढलेल्या वजनामुळे लोक फॅट, फॅट मिस युनिव्हर्स आणि प्लस साईज मॉडेल असे कमेंट्स देत आहेत.

ट्विटरवर तिच्या जुन्या फोटोंसह शोमदील नवीन फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. मिस युनिव्हर्स असताना असलेली हरनाज आणि शोमधील हरनाज पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, विजेतेपद जिंकल्यानंतर केवळ 3 महिन्यांनंतर तिचे वजन खूप वाढले आहे.

हरनाजचे वजन कसं काय वाढलं?

फिटनेस फ्रिक असलेल्या मिस युनिव्हर्सचे कमी कालावधीत वजन कसे वाढले, हा प्रश्न सर्वाना पडलाय. ती जाडजुड दिसत असल्याने काही लोक तिला ट्रोल करत आहेत. हरनाजने वजन वाढल्याचे कारण देत स्वतःमधील बदलाचे कारण सांगितले आहे.

हरनाज संधू
हरनाज संधू

ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर

तिने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. बॉडी शेमिंगवर तिने नाराजी व्यक्त केलीय. तिने एका मुलाखतीत सांगितले की, मला लोकांच्या नकारात्मक कमेंट्स किंवा ट्रोलिंगची हरकत नाही. मी माझ्या शरीराचा आदर करते. मला ट्रोलिंग करायला हरकत नाही. मला ग्लूटेनची ॲलर्जी आहे हे लोकांना माहिती नाही. या ग्लुटेन ॲलर्जीमुळे वजन खूप वाढले आहे. चेहराही खूप जाड झाला आहे.

हरनाज स्वत: या ॲलर्जीमुळे वाढलेल्या वजनाने त्रस्त आहे. या आजाराने त्रस्त असलेल्या हरनाजने ज्याप्रकारे आपल्या समस्येबद्दल सांगितले, त्यावरून हे स्पष्ट होते की तिला या आजाराची समस्या आहे. ती आतड्यांसंबंधी आजार आहे. या आजारामुळे शरिरात ग्लूटेनचे पचन होऊ शकत नाही, त्यामुळे वजन वाढू लागते. या आजाराने त्रस्त लोकांना अन्न, जीवनसत्त्वे, खनिजे शोषून घेण्यास त्रास होतो. त्यामुळे त्यांच्या शरिरात त्वचेखालील थरात चरबी जमा होऊ लागते आणि शरीर फुगते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news