पुढारी ऑनलाईन डेस्क
सुपरस्टार सलमान खानची तथाकथित गर्लफ्रेंड सोमी अली चर्चेत आली आहे. अभिनेत्री सोमी अलीने कोणाचेही नाव न घेता 'बॉलिवुडमधील हार्वे वाइनस्टीन'चा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा दिला आहे. तिने इन्स्टाग्राम पोस्ट लिहिलीय. त्यामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, 'बॉलीवूडचे हार्वे विन्स्टीन' ज्या महिलांचे तू शोषण केलेस, त्यांचा पर्दाफाश होईल. सत्य समोर येईल. जसे ऐश्वर्या राय बच्चनने केली आहे.
सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहेत. त्यात सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय अशा अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. पण सर्वात जास्त तो सोमी अली आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत राहिला आहे. आता सोमी अलीने खळबळ उडवून दिली आहे.
सलमान खान आणि पाकिस्तानची अभिनेत्री सोमी यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान आणि सोमी अली जवळपास आठ वर्षे एकमेकांना डेट करत होते. सोमी अलीला सलमान खानसोबत लग्न करायचं होतं. वयाच्या १६ व्या वर्षी ती बॉलिवूडमध्ये आपले करिअर करण्यासाठी मुंबईत आली. येथे सलमान खानसोबत काम केल्यानंतर तिला सलमान सोबत लग्न करायचं होतं. अखेर सलमानसोबतचे तिचे नाते १९९९ मध्ये पूर्णपणे संपुष्टात आले.
सोमीने गंभीर आरोप करत उघडपणे धमकी दिली आहे. सोमीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. पण, तिने ही पोस्ट आता हटवलेली आहे. तिने एक फोटोचा स्क्रिनशॉट शेअर केला होता. यामध्ये लिहिले, 'बॉलिवूडचा हार्वे वाइनस्टीन! तुझा लवकरच पर्दाफाश होईल. तू ज्या महिलांचे शोषण केलेस, ते एक दिवस बाहेर येतील आणि सत्य सर्वांना कळेल. जसे ऐश्वर्या राय बच्चनसारखे. यासोबतच तिने ऐश्वर्यालाही या पोस्टमध्ये टॅग केले आहे.
हार्वे विन्स्टीन हा हॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट निर्माता आहे. बलात्कार आणि लैंगिक अत्याचारासारखे गंभीर आरोप त्याच्यावर होते. हार्वेवर अनेक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रींसह अनेक महिला आणि अभिनेत्रींनी बलात्कार, प्राणघातक हल्ला, लैंगिक शोषण आणि गुंडगिरीचे गंभीर आरोप केले होते.
पाकिस्तानी वंशाची अमेरिकन रहिवासी असलेली सोमी अली ही सलमानची पहिली गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले जाते. १९९९ मध्ये सलमान खानसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर सोमी आपल्या देशात अमेरिकेला परतली. 'बुलंद' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सोमी अली आणि सलमान खानची जवळीक वाढल्याची माहिती सर्वश्रुत आहे. याआधीही सोमी अलीने सलमान खानबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
हेही वाचलं का?