Urmila Matondkar :’रंगीलानंतर लोकांनी टोमणे मारले, जे केलं ते सेक्स…’

Urmila Matondkar :’रंगीलानंतर लोकांनी टोमणे मारले, जे केलं ते सेक्स…’

पुढारी ऑनलाईन डेस्क

आधी चित्रपट आणि नंतर राजकीय क्षेत्रात आपलं नशीब आजमावणाऱ्या रंगीला गर्लचा (urmila matondkar) आज ४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. जॅकी श्रॉफ, आमीर खान, फरदीन खान यासारख्या स्टारर्ससोबत हिट चित्रपट देऊन उर्मिला मातोंडकरने (urmila matondkar) आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. वयाच्या चाळीशीत लग्न करून सेटल होणाऱ्या उर्मिलाला मात्र आपल्या फिल्मी करिअरमध्ये काही वाईट गोष्टींचा सामनादेखील करावा लागला होता.

उर्मिलाने बालकलाकार म्हणून १९८३ मध्ये गुलजार यांचा चित्रपट मासूममध्ये काम केलं आहे. तिने अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरूवात मल्याळम चित्रपट 'चाणक्यन' मधून केली होती. पण, तिला सुपरस्टार शाहरुख खानसोबत चमत्कार (१९९२) चित्रपट मिळाला आणि तिनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तिचा सुपरहिट चित्रपट ठरला तो रंगीला. यामध्ये तिच्यासोबत आमिर खान होता.

यानंतर तिने बेदर्दी, खून, मनी मनी यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय तिने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत जुदाई या चित्रपटात काम केले. यामध्ये अनिल कपूर मुख्य अभिनेते होते.

उर्मिलाला रामगोपाल वर्माचा चित्रपट 'रंगीला'ने इतकं हिट केलं की, रातोरात बड्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होऊ लागली. 'रंगीला' १९९५ मध्ये रिलीज झाला होता. यासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

आपल्या सुंदर लूक्स, आणि सिजलिंग हॉट डान्स मुव्ह्जने सर्वांनाच भूरळ घातली. पण, नुकताच उर्मिलाने एका मुलाखतीत खुलासा केला की, चित्रपट रंगीलाच्या यशानंतर लोक तिच्याशी कशाप्रकारे व्यवहार करत होते. उर्मिला म्हणाली की, तिच्या अभिनयाचे श्रेय तिला कधीचं मिळालं नाही. लोक म्हणायचे की, राम गोपाल वर्माच्या चित्रपटात तिला केवळ सेक्स अपीलसाठी कास्ट करण्यात आलं होतं. तिचा अभिनयाशी कुठलाही संबंध नव्हता. तिने प्रश्न उपस्थित केला की, हाई रामा गाणे एक प्रदर्शन म्हणून का मानलं जाऊ शकत नाही. काय केवळ भावनात्मक दृश्येच अभिनयाचा भाग असू शकतात का? असाही प्रश्न तिने विचारला.

ती म्हणाली, "इतका मोठा हिट चित्रपट झाल्यानंतरदेखील…पुरस्कारांना विसरून जा…. माझ्याकडे माझ्याविषयी एक चांगला शब्द देखील लिहिण्यात आला नव्हता. माझे कपडे, माझे केस…बाकी सर्वाला श्रेय देण्यात आलं होतं."

ती पुढे म्हणाली की, ज्या अभिनेत्रींनी १३ फ्लॉप चित्रपट दिले आणि म्हटलं जात होतं की, त्या पुरुषांसारख्या दिसतात. आणि ज्यांनी नायकांसोबत अश्लील गामी केली, त्यांना अभिनेता म्हणून मानलं गेलं. माझ्यासाठी कॅमेऱ्यासमोर राहणं, लता मंगेशकर आणि आशा भोसले माझ्यासाठी गाणी गायल्या, हा सर्वात मोठी विजय होता. मला कुठल्याही पुरस्कारांची आवश्यकता नाही.

उर्मिलाने जुदाई, सत्या, प्यार तुने क्या क्या, भूत, एक हसीना थी , पिंजर आणि बस एक पल यासारख्य़ा चित्रपटांमध्येही काम केलं आहे. २०१६ मध्ये तिने काश्मीरचा उद्योगपती मोहसिन अख्तर मीरसोबत लग्न केलं होतं. मोहसिन उर्मिलाशी १० वर्षांनी लहान आहे. असं म्हटलं जात की, त्यांची पहिली भेट फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात झाली होती. मोहसिनने एका चित्रपटातदेखील काम केलं आहे. जोया अख्तरचा लक बाय चान्स असं त्या चित्रपटाचं नाव होतं. मोहसिन हँडसम आहे आणि त्याने मिस्टर इंडिया स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले आहे.

लग्नानंतर उर्मिलाने २०१८ मध्ये एक चित्रपट साईन केला होता-त्याचं नाव होतं -ब्लॅकमेल. येथेही तिने एक सॉन्ग केलं होतं. यानंतर ती लाईमलाईटपासून दूर गेली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news