नाशिक : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी कॉलेज बस उलटली ; 20 हून अधिक जखमी | पुढारी

नाशिक : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी कॉलेज बस उलटली ; 20 हून अधिक जखमी

पुढारी वृत्तसेवा : नाशिक – औरंगाबाद रोडवर आज सकाळी कॉलेजच्या बसचा आणि ट्रकचा अपघात झाला. यामध्ये २० ते २२ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रकला धडकल्यानंतर बस रस्त्यावरच उलटली. ही बस SMBT कॉलेजच्या विद्यार्थ्यांची असल्याचे समोर आले आहे.

कॉलेज बस सकाळी सात वाजता धामणगावकडे निघाली होती. तेव्हा बस आणि ट्रकची धडक झाली. यावेळी बस उलटल्यानं २० ते २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. आज शुक्रवार दि. 4 सकाळी 7 वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.

धामणगाव येथील एसएमबीटी कॉलेजचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांना घेऊन बस जात होती.  शहरातील तपोवन परिसराजवळील हॉटेल मिरची चौफुली वळणावर बस आली असता, त्याचवेळी औरंगाबादकडून येत असलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. ट्रकचा वेग अधिक असल्याने जोराची धडक बसली व त्यामुळे बस जागीच पलटी झाली. यात 20 ते 22 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा ;

Back to top button