सांगली : पलूस नगरपरिषद निवडणूक ताकदीने लढवू. | पुढारी

सांगली : पलूस नगरपरिषद निवडणूक ताकदीने लढवू.

पलूस : पुढारी वृत्तसेवा

कडेगाव नगरपंचायतीमध्ये टाकलेल्या स्वतंत्र पावलाने कार्यकर्त्यांमध्ये नवीन उमेद जागी झाली आहे. भाजप, स्वाभिमानी विकास आघाडी आणि इतर मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे; पण अजून कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. फक्‍त आघाडी धर्म पाळायचा की, पलूस नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्येही स्वतंत्र पॅनेल उभे करायचे हे कार्यकर्त्यांच्या व श्रेष्ठींच्या मताने ठरवले जाईल, असे प्रतिपादन आमदार अरूण लाड यांनी केले.

पलूस नगरपरिषद निवडणूक ताकदीने लढवू

ते कुंडल येथे बैठकीत बोलत होते. लाड पुढे म्हणाले, पलूस नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही शहरात आमचा गट सांभाळून विकासकामांना प्राधान्य देत आहोत. सामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत कामाच्या जोरावर या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. गेल्या निवडणुकीत सगळे वेगळे लढलो त्यामुळे विरोधी काँग्रेस पक्षाला फायदा झाला. त्यामुळे यावेळी विखुरलेली ताकद एकत्र झाली तर सत्तापालट होऊ शकतो, असे आडाखे आखले जात आहेत. ते म्हणाले, पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो आणि जिंकलो. पण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर आघाड्या केल्या जातात. आपण गेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पाहिले आहे, तसे पलूसमध्ये कोणाबरोबर आघाडी करायची की महाविकास आघाडी म्हणून सामोरे जायचे हे येत्या काही दिवसांत ठरेल.

आमदार लाड म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत झालेली गटबाजी, कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत घेतलेले निर्णय याचा परिपाक म्हणजे पलूस नगरपरिषदेची निवडणूक असेल. त्या निवडणुकीला आम्ही पूर्ण ताकदीने सामोरे जाऊ.

हेही वाचलतं का? 

Back to top button