HBD Sunny Leone : सनी लिओनीनं पॉर्न इंडस्ट्री का निवडली? कारण ऐकून थक्क व्हाल!

HBD Sunny Leone : सनी लिओनीनं पॉर्न इंडस्ट्री का निवडली? कारण ऐकून थक्क व्हाल!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

सनी लिओनी (HBD Sunny Leone) आता बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र, एका मुलाखतीत तिने स्वत: कबूल केले आहे की, पॉर्न स्टारचा लागलेला टॅग आयुष्यभर तिचा पिच्छा सोडणार नाही. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सनीने पॉर्न इंडस्ट्रीत येण्याचा निर्णय तिने स्वतःच्या इच्छेने घेतला होता. मात्र, जेव्हा तिने आपल्या पालकांना याबाबत सांगितले, तेव्हा ते खूप संतप्त झाले. पण, सनीने स्वत:च्या आयुष्याचा मार्ग निवडला होता. आज तिचा वाढदिवस आहे. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! (HBD Sunny Leone)

सनीने खरे नाव करणजीत कौर वोहरा आहे. चित्रपटात येण्यापूर्वी सनीने नर्सिंगचे शिक्षण घेत होती. सनीने सांगितले होते की, लहानपणी ती आपल्या कुटुंबासह गुरुद्वाराला जायची. सनी खूप छान हार्मोनियम वाजवायची आणि तिचा भाऊ तबला वाजवायचा. लहानपणी सनीला बॉलिवूड चित्रपटांचीही खूप आवड होती. वयाच्या १९ व्या वर्षी ती अॅडल्ट इंडस्ट्रीत दाखल झाली.

या व्यक्तीने सनीला आणले पोर्न इंडस्ट्रीत

सनीला पॉर्न इंडस्ट्रीत आणणारी एक व्यक्ती होती. खरं तर, सनीने तिची पहिली नोकरी जर्मन बेकरीमध्ये केली. त्यावेळी ती १५ वर्षांची होती. या बेकरीमध्ये काम करत असताना तिचे एका व्यक्तीशी सूत जुळले होते. त्याने तिला ॲडल्ट मॉडेलिंगच्या मार्गावर आणले. डिसेंबर, २००५ मध्ये सनी लिओनच्या नावाने तिचा पहिला ॲडल्ट चित्रपट रिलीज झाला होता. सनी पॉर्न चित्रपटामध्ये कामचं करायची नाही तर ती दिग्दर्शनही करायचीय. हा एक मोठा बिझनेस आहे, ज्यासाठी तुम्हाला टॅलेंटसोबत कौशल्याचीही गरज आहे, असे ती म्हणते.

एका मुलाखतीदरम्यान सनीने सांगितले होते की, ती व्यवसायाच्या दृष्टीकोनातून पॉर्न इंडस्ट्रीत आली होती. ती म्हणाली होती की, मी माझ्या पालकांच्या संमतीशिवाय पॉर्न इंडस्ट्रीत सामील झाले. तो माझ्यासाठी एक व्यवसाय होता. तथापि, मला पेंटहाऊसचे (ॲडल्ट इंडस्ट्रीचे प्रसिद्ध मासिक) कव्हर ऑफ द इयर आणि $१००,००० (अंदाजे ६८ लाख रुपये) मिळाले होते. नंतर पालकांना त्याबद्दल माहिती दिली. साहजिकच सर्व सामान्य पालकांप्रमाणे त्यांनाही माझ्यावर राग आला. मी त्यांना माझ्या आयुष्यात हा निर्णय घेतला आहे असे सांगितले.

सनीचा जन्म १९८१ मध्ये कॅनडातील सारनिया ओंटारियो येथे एका पंजाबी शीख कुटुंबात झाला. ती ११ वर्षांची असताना जेव्हा ती कुटुंबासह अमेरिकेत शिफ्ट झाली होती. सनीचे वडील इंजिनिअर होते, तर आई गृहिणी होती. तिला एक भाऊ देखील आहे, त्याचे नाव संदीप सिंग वोहरा आहे आणि तो अमेरिकेत शेफ म्हणून काम करतो.

पुढे सनी ॲडल्ट चित्रपट इंडस्ट्रीमध्ये एक पॉर्न स्टार म्हणून प्रसिध्द झाली. दुसरा पॉर्न चित्रपट 'व्हर्च्युअल विविड गर्ल'साठी सनीला एव्हीएम ॲवॉर्डदेखील मिळाला आहे. या ॲवॉर्डला पॉर्न चित्रपट इंडस्ट्रीचे ऑस्कर म्हटलं जातं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news