

पुढारी ऑनलाईन डेस्क
सध्या दाक्षिणात्य चित्रपट व बॉलीवूडमध्ये भाषेवरून मतमतांतरे ऐकण्यास मिळत आहेत. अशा वेळी एका मुलाखतीत रणवीर सिंहने म्हटले की, चित्रपटाची पटकथा ही सर्वात महत्त्वाची असते. ती भाषेच्या सीमा ओलांडणारी असेल तर एखादा चित्रपट कुठेही यश मिळवू शकतो. आमीर खानचे चित्रपट अगदी चीनमध्येही चालतात. 'पॅरासाईट'सारख्या कोरियन चित्रपटानेही सर्व प्रकारच्या सीमा ओलांडल्या. मला स्वतःला 'पुष्पा' अतिशय आवडला आणि त्यामधील 'ऊ अंतावा' हे गाणेही आवडते. मी 'केजीएफ-1' पाहिलेला आहे व दुसरा भाग पाहण्यासाठी उत्सुक आहे. दक्षिणेतील कलाकार उत्तम काम करीत आहेत आणि जगभरातील लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे.