HBD Mithun Chakraborty : नक्षलवादी होते मिथुन, एका निर्णयाने…

mithun chakraborty
mithun chakraborty
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आय एम ए डिस्को डान्सर हे गाणं ऐकलं की आठवतो तो मिथून चक्रवर्ती. (HBD Mithun Chakraborty) वारदात, अविनाश, जाल, डिस्को डान्सर, भ्रष्टाचार, घर एक मंदिर, वतन के रखवाले, हमसे बढकर कौन, चरणों की सौगंध, हमसे है जमाना, बॉक्सर, बाजी, कसम पैदा करने वाले की, प्यार झुकता नहीं, करिश्मा कुदरत का, स्वर्ग से सुंदर यासारख्या ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले मिथुनदा म्हणजेच मिथुन चक्रवर्ती त्यांचा आज १६ जून रोजी वाढदिवस आहे. खूप कमी लोकांना माहिती असेल की, मिथुन हे चित्रपटात येण्यापूर्वी नक्षलवादी होते. एका नक्षलवाद्याचा बॉलिवूडच्या अभिनेत्यापर्यंतचा प्रवास कसा होता, हे जाणून घेऊया. (HBD Mithun Chakraborty)

१९९३ ते १९९८ चा काळ. या काळात मिथुन यांचे चित्रपट सटकून आपटत होते. यावेळी त्यांचे एकूण ३३ चित्रपट फ्लॉप ठरले. तरीही त्यांचं स्टारडम कायम राहण्यामागे कोणतं कारण आहे? अनेक दिग्दर्शकांवर मिथुन यांची रुंजी होती, तेव्हा त्याने १२ चित्रपट साईन केले होते.

१६ जून, १९५० रोजी कोलकाता येथे मिथुन यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव गौरांग चक्रवर्ती असं आहे. पण, या नावाचा वापर त्यांनी कधीचं चित्रपटांत वापरले नाही. मिथुन बॉलिवूडच्या व्यक्तींच्या यादीमध्ये आहे, ज्या कलाकारांचे कुठलेही चित्रपट बॅकग्राउंड नाही. इंडस्ट्रीत कुणी नी कुणी गॉडफादर असतो. परंतु, तरीही मिथुन यांने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या मेहनतीने एक वेगळी प्रतिमा निर्माण केली.

राजकारणात तरुण असल्यापासून मिथुन सक्रिय होते. अल्पवयीन असल्यापासून त्यांचा त्यांच्या वडिलांशी वैचारिक मतभेद होते. चित्रपटात येण्यापूर्वी ते नक्षलवाद्यांशी संबंधित होते. मिथुन यांची ओळख रवि रंजन नावाच्या एका लोकप्रिय नक्षलवाद्याशी झाली होती. पोलिसदेखील मिथुन यांच्या मागावर होते. मिथुन यांचा भाऊ एका दुर्घटनेत मारला गेला. त्यामुळे दु:खी झालेल्या मिथुन यांच्यासाठी नक्षलवादी जवळचा परिवार झाला. पुढे त्यांनी सर्वकाही सोडलं आणि चित्रपटात नशीब आजमवण्यासाठी प्रयत्न केले.

मिथुन चक्रवर्तीची जीवन-यात्रा पाहिली तर मिथुन खूप परिश्रम घेतले. त्यांनी बी.एससी. केलं, त्यामध्ये सुवर्णपदकही मिळवलं. तसेच ते कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. डान्समध्येही त्यांनी निपुणता मिळवली. 'डिस्को डांसर' त्यांचा गाजलेला चित्रपट आला. चित्रपट येण्यापूर्वी त्यांनी एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला होता.

त्यांचा पहिला चित्रपट 'मृगया' (१९७६) होता. मृणाल सेन या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. मिथून यांनी असा अभिनय केला की,  पहिल्या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांनी काही चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. मग, त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये प्रसिध्दी मिळाली. सामान्य जनता मिथुन यांना गरिबांचा अमिताभ बच्चन म्हणायची. मिथुन यांच्या फॅन्सची संख्यादेखील कोटींमध्ये होती.

विवाहित असतानाही श्रीदेवीशी दुसरा विवाह

मिथुनने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात १९७६ मध्ये आलेला चित्रपट 'मृगया'मधून केली होती. या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर मिथुन यांने अनेक हिट चित्रपट दिले. ते एक यशस्वी अभिनेता होता. त्याचे नाव को-स्टार रंजीता, योगिता बाली, सारिका आणि अन्य अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण, श्रीदेवीसोबत त्याच्या अफेअरची चर्चा सर्वात अधिक झाली. १९८४ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'जाग उठा इंसान' मध्ये मिथुन-श्रीदेवी यांनी पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगपासून दोघांच्या अफेअरचे वृत्त येऊ लागले. मिथुन चक्रवर्ती यांनी एका मुलाखतीत स्वत: कबूल केलं होतं की, त्याने श्रीदेशी गुपचुप लग्न केलं होतं.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news