पुन्हा स्कूल चले हम ! शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर हसू | पुढारी

पुन्हा स्कूल चले हम ! शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर हसू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ढोल ताशांचा गजर, फुलांची उधळण, रांगोळी, पताका व फुग्यांची सजावट, प्रवेशव्दारात आल्यानंतर औक्षण, उपस्थितांच्या हस्ते गुलाबपुष्प व चॉकलेट असे विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत शहरातील मनपा आणि खासगी शाळांनी केले. काही चिमुकल्यांनी हसत तर काहींनी पालकांच्या आठवणींनी अश्रू  ढाळत शाळेत प्रवेश केला.

शहरातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. ढोल – ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी शाळेत पाऊल टाकले. यंदाचे वर्ष ऑफलाइन असल्यामुळे शाळेत येताना विद्यार्थ्यांचे चेहेरे आनंदाने फुलले होते. यावेळी पालकही आवर्जुन मुलांना शाळेत सोडायला आले होते. यावेळी सर्व वर्गांना तोरण बांधून, पताका फुगे लावून व रांगोळी काढून शालेय परिसर सुशोभित करण्यात आला होता. नव्या वह्या, नवी पाटी, आणि नवी पुस्तके, डबा अशा सगळ्या वस्तूंनी भरलेले दप्तर पाठीवर घेऊन विद्यार्थी शाळेला दाखल झाले.

नाशिक : सॉफ्टवेअरच्या सहाय्याने इम्पिरिकल डेटा गोळा करणे म्हणजे गावंढळपणा

सुमारे दीड महिन्याच्या सुट्टीत मौजमस्ती करून ताजेतवाने झालेल्या मुलांनी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आनंदी व उत्साहित होऊन शाळांमध्ये प्रवेश केला. पालकांची मुलांना शाळेत पोचवण्याची धावपळ, विद्यार्थ्यांना वर्गात बसवण्याची धावपळ, सर्व रस्ते विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजलेले वातावरण सकाळी पाहायला मिळाले.

पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेतलेल्या काही चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर थोडी भीती होती आणि कुठे रडारड होती. कुठे विद्यार्थ्यांना फूल, चॉकेलेट देऊन स्वागत करण्यात आले. बरेच विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवशी गैरहजर राहतात. म्हणून खासगी शाळा शाळेच्या पहिल्या दिवशी कोणीही गैरहजर राहू नये यासाठी दंड आकारतात. त्यामुळे पालकांनीही जबाबदारीने पहिल्या दिवशी मुलांना शाळेत पाठविले होते.

Back to top button