Video : सत्तारूढ गटाला कपबशी, विरोधकांना विमान चिन्ह | पुढारी

Video : सत्तारूढ गटाला कपबशी, विरोधकांना विमान चिन्ह

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा येथील श्रीराम सेवा संस्था निवडणुकीत १७ पैकी भटक्या विमुक्‍त जाती जमाती प्रतिनिधीची निवड बिनविरोध झाली, तर १६ संचालकांसाठी ३१ उमेदवार रिंगणात आहेत. २५ जून रोजी मतदान आहे.दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री हनुमान शेतकरी सेवा पॅनेलच्या उमेदवारांना कपबशी व विरोधी माजी सभापती दिलीप उलपे व माजी नगरसेवक प्रदीप उलपे यांच्या नेतृत्वाखालील श्री राम पॅनेलच्या उमेदवारांना विमान चिन्ह मिळाले.

सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटात १२ जागांसाठी २४, महिला प्रतिनिधी गटात २ जागाांठी ३, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गटात १ जागेसाठी २, इतर इतरमागासवर्ग प्रतिनिधी गटात १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक बिनविरोधसाठी मंत्री पाटील गटाकडून विरोधी गटाच्या तिघांना संधी देण्याचा प्रस्ताव दिला. विरोधी गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांत एकमत न झाल्याने निवडणूक लागली.

हेही वाचा

Back to top button