Konkona Sen : लग्नाआधी प्रेग्नेंट झाली होती ‘ही’ अभिनेत्री

happy birthday konkona sen
happy birthday konkona sen
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :

काही अभिनेत्रींना तू काळी आहेस, तू सावळी आहेस म्हणून हिणवलं गेलं. बॉलिवूडमध्ये तर एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत. पण, काही वेळी गोऱ्या रंगाला अधिक महत्त्व दिलं जातं. अभिनेत्रींना अनेकदा रंगभेदाला सामोरं जावं लागलंय. जर दिसण्यावरून, रुपावरून एखाद्या महिलेची चेष्टा होत असेल तर तिनं काय करावं. तर तिनं कोंकणा सेनसारखं (Konkona Sen) राहायला हवं. कोंकणा सेनने वर्णभेदाला कधीचं जुमानलं नाही. ( Konkona Sen) तिच्या करिअरमध्ये तिचा सावळा रंग कधीचं अडसर ठरला नाही. दमदार अभिनय आणि अदाकारीवर तिने हिंदी आणि बंगाली इंडस्ट्री गाजवली. तुम्हाला माहिती आहे का, कोंकणा तिच्या पर्सनल लाईफवरून अनेकदा चर्चेत राहिलीय.

कोंकणा सेन
कोंकणा सेन

Konkona Sen ही अभिनेत्री अपर्णा सेन यांची मुलगी आहे. कोंकणा भारतीय आर्ट मुव्हीज आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये दिसते. आपल्या दमदार अभिनयाने इंडस्‍ट्रीत तिने पाय रोवले आहेत. आज कोंकणाचा ४२ वा वाढदिवस आहे. तुम्हाला माहितीये का, कोंकणा लग्नाआधीचं प्रेग्नेंट झाली होती. ती तिच्या खासगी आयुष्यावरूनही चर्चेत राहिलीय.

कोंकणा सेन
कोंकणा सेन

कोंकणाने २००७ मध्ये अभिनेता रणवीर शौरीला डेट करणं सुरू केलं होतं. असं म्हटलं जातं की, रिलेशनशीमध्ये असताना ती प्रेग्नेंट झाली होती. त्यामुळे या कपलने ३ सप्टेंबर, २०१० रोजी लग्न केले. पुढे तिने १५ मार्च, २०११ रोजी हारूनला जन्म दिला.

कोंकणा सेन
कोंकणा सेन

कोंकणा-रणवीर यांचे २००७ ला डेटिंग सुरू झाले होते. त्यानंतर तीन वर्षांनी लग्न केले. परंतु,, दोघांचं नातं टिकू शकलं नाही. २०१५ मध्ये ते वेगळे झाले. रणवीर शौरी-कोंकणाने 'ट्रॅफिक सिग्नल', 'मिक्स्ड डबल्स', 'आजा नचले' आणि 'गौर हरि दास्तान' आणि 'ए डेथ इन द गंज' यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. 'ए डेथ इन गुंज' साठी तिला बेस्ट डेब्यू डायरेक्टरचा ॲवॉर्ड मिळाला.

बालकलाकार म्हणून सुरुवात

कोंकणाने चित्रपट इंदिरा (१९८३) मध्ये एक बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. तिने बंगाली थ्रिलर एक जे अच्छे कन्या (२०००) मधून एडल्‍ट म्हणून डेब्‍यू केलं होतं. जिसमें उनके काम की जमकर तारीफ हुई. २००२ मध्ये ऋतुपर्णो घोष यांचा तित्रपट 'तितली' मध्ये कोंकणाने काम केलंय. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यास ती यशस्वी ठरली.

'अजीब दास्तान'मध्ये तिने दलित लेस्बियन फॅक्ट्री वर्करची भूमिका साकारली होती. बॉडी लँग्वेज ते एक्सप्रेशनपर्यंत सर्व गोष्टी या भूमिकेसाठी परफेक्ट होत्या. 'तलवार', 'लिपस्टिक अंडर माय बुर्का' यासारख्या चित्रपटांत अभिनय साकारताना तिने जीव ओतला होता. 'वेक अप सिड', 'लक बाय चान्स' यासारख्या हलक्याफुलक्या चित्रपटांमध्येही तिनं काम केलंय. 'ओमकारा', 'लागा चुनरी में दाग' साठी फिल्मफेयर ॲवॉर्डने तिला सन्मानित करण्यात आले आहे.

तिने इंग्रजी भाषेतील चित्रपट मिस्टर अँड मिसेज अय्यर मधील तिच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. चित्रपटातील तिच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तिला पेज ३ (२००५) मधून चांगली ओळख मिळाली.

पुढे तिने ओमकारा (२००६) आणि लाईफ इन ए मेट्रो (२००७) मध्ये दमदार अभिनय केला होता. यातील अभिनयासाठी तिला दोन वेळा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला.

खासगी जीवनही चर्चेत

चित्रपट 'आजा नच ले'च्या सेटवर अभिनेता रणवीर शौरी आणि कोंकणाची भेट झाली. दोघांमध्ये प्रेम झालं. त्यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या. यादरम्यान ती प्रेग्नेंट झाली. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

२०१५ मध्ये घटस्फोट

दोघांनी २०१५ मध्ये घटस्फोट घेतला. दोघेही वेगळे राहू लागले. दोघांनी सोशल मीडियावर वेगळे झाल्याचे जाहिर केले. वेगळे झाल्यानंतर ५ वर्षांनी घटस्फोट मिळाला. कोर्टाने मुलाचा ताबा कोंकणाकडे दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Konkona Sensharma (@konkona)

 

View this post on Instagram

 

A post shared by Konkona Sensharma (@konkona)

 

View this post on Instagram

 

A post shared by Konkona Sensharma (@konkona)

 

View this post on Instagram

 

A post shared by Konkona Sensharma (@konkona)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news