बॉलिवूडमध्ये शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan) हे बॉलिवूडमध्ये क्यूट कपल्सपैकी एक आहेत. २७ वर्षांचा त्यांचा प्रवास आजही सुरळीतपणे सुरू आहे. २५ ऑक्टोबर, १९९१ मध्ये दोघांनी विवाह केला. ८ ऑक्टोबर रोजी गौरी खानचा (Gauri Khan) वाढदिवस. ती आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या औचित्याने गौरी खान आणि शाहरूख खानबद्दल जाणून घेऊयात, या खास गोष्टी.
शाहरुख खानशी विवाह करण्यापूर्वी गौरी खानचं नाव गौरी छिब्बर होतं. गौरी आज एक यशस्वी उद्योजिका आहे. गौरी रेड चिलीज एंटरटेनमेंटची को-ओनर आहे. तिने आपला पहिला चित्रपट 'मैं हूं ना' २००४ मध्ये प्रोड्यूस केला होता. इंटिरियर डिझायनर गौरी खानने आपलं करिअर २०१२ मध्ये सुरू केलं होतं.
गौरी खान आणि शाहरूख खान याची लव्ह स्टोरीही हटके आहे. परंतु, त्यांच्या आयुष्यात असं एक वळण आलं की, दोघांचा ब्रेकअप झाला. पण, दोघे पुन्हा भेटणार, हे कोणाला माहित होतं. शाहरुख खान आणि गौरी शाळेत असल्यापासून एकमेकांशी प्रेम करत होते. आणि अनेक वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी आपल्या प्रेमाबद्दल घरच्या मंडळींना सांगितले. शाहरुख खान मुस्लिम असल्याने गौरीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं.
गौरीप्रमाणेच शाहरुखही दिल्लीचा रहिवासी होता. दोघांची पहिली भेट १९८४ मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत झाली. त्यावेळी शाहरुख फक्त १८ वर्षांचा होता आणि गौरी १४ वर्षांची. मजेशीर म्हणजे शाहरुखच्या लाजाळू स्वभावामुळे गौरीसमोर तो आपलं प्रेम व्यक्त करू शकला नाही.
गौरी ज्या-ज्या पार्टीत जायची, तेथे पहिल्यांदा तो हजर राहायचा. गौरी आणि शाहरुखचं फ्रेंड सर्कल कॉमन होते. मित्रांच्या मदतीने आणि थोड्याशा हिंमतीने त्याने गौरीचा नंबर मागितला आणि गौरीने देखील आपला फोन नंबर शाहरुखला दिला. त्यानंतर दोघांचं बोलणं नित्याचचं झालं. थोड्या दिवसांनंतर शाहरुख आणि गौरीमध्ये वाद होऊ लागले. हे वाद अधिकच वाढल्याने गौरी दिल्ली आणि शाहरुखला सोडून मुंबईत आली.
शाहरुख खान सुरुवातीला गौरीबद्दल खूप पझेसिव्ह होता. दुसर्यांशी बोलणे आणि केस मोकळे ठेवणं हे शाहरुखला आवडायचं नाही. या गोष्टीला कंटाळून गौरीने शाहरूखशी ब्रेकअप घेतला होता. नंतर शाहरुख तिला भेटण्यासाठी पुन्हा मुंबईत गेला.
गौरीसाठी शाहरुखला कसरत करावी लागली. तिच्या आई-वडिलांना इम्प्रेस करण्यासाठी त्याने आपण हिंदू असल्याचं सांगितलं होतं.
शाहरुखला ज्यावेळी समजलं की, गौरी मुंबईला निघून गेलीय, त्यावेळी शाहरुखही मुंबईत आला. त्यावेळी शाहरुखजवळ पैसेही नव्हते. पैशांची जमवाजमव करून गौरीला शोधण्यासाठीत तो मुंबईत पोहोचला. शाहरुखने गौरीला खूप शोधलं, पण तिचा पत्ता लागेना. निराश होऊन शाहरुख मुंबईच्या एका बीचवर जाऊन बसला. त्याचवेळी तेथे त्याला गौरी दिसली. ती आपल्या मैत्रीणींसोबत तेथे आली होते. त्यांनी एकमेकांना पाहिले आणि दोघांनाही रडू कोसळले. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.
शाहरुख गौरीवर खूप प्रेम करायचा. शाहरुखचे मित्र जेव्हा त्याची चेष्टा करायचे, त्यावेळी शाहरुख म्हणायचा….'माझी गौरी सर्वांत हॉट आहे.'