Sukh Mhanje Nakki Kay Asta : गौरीचा नवा लूक पाहिला का? | पुढारी

Sukh Mhanje Nakki Kay Asta : गौरीचा नवा लूक पाहिला का?

पुढारी ऑनलाईन :

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं आहे. सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं असून गौरीच्या नव्या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे. गौरीची भूमिका अभिनेत्री गिरीजा प्रभूने साकारलीय. तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या नव्या लूकची प्रशंसा केली जात आहे. (Sukh Mhanje Nakki Kay Asta)

सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर गौरीला नवा आत्मविश्वास मिळाला. जयदीपच्या मदतीने तिचं शिक्षणही पूर्ण होत आहे. गौरीच्या मेकओव्हर मागे जयदीपचाही महत्त्वाचा वाटा आहे.

गौरीने आपली मतं ठामपणे मांडावीत. शालिनीची अरेरावी सहन करु नये अशी जयदीपची इच्छा होती. त्यामुळे गौरीचा फक्त लूक नाही तर तिच्या व्यक्तिमत्त्वात देखील परखडपणा येऊ लागला आहे. गौरीचं हे बदललेलं रुप प्रेक्षकांनाही आवडतं आहे.

या मालिकेचे पुढील भाग देखील मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच माईंनी शालिनीला घराबाहेर काढलं. या अपमानाचा बदला म्हणून शालिनीनंदेखील माईंना घराबाहेर काढलं. त्यामुळे शिर्के-पाटील कुटुंबावरच्या या संकटाचा सामना गौरी कसा करणार. हे पाहणं उत्सुकतेचं असेल. त्यासाठी पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

गिरीजा प्रभूविषयी जाणून घ्या या गोष्टी 

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीप आणि गिरिजा यांची केमिस्ट्री पाहायला मिळतेय. ही जोडी चाहत्यांच्या खूपच पंसतीस उतरली आहे. गिरीजा खऱ्या आयुष्यात ऑलराऊंडर आहे. ती उत्तम अभिनेत्री आहे. तसेच ती प्रोफेशनल डान्सरसुद्धा आहे.

झी युवा वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रिॲलिटी शोमध्ये तिने सहभाग घेतला होता. याव्यतिरिक्त तिला चित्रकलेचीही आवड आहे. मंडाला आर्टचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. गिरीजा योगादेखील करते. गिरीजा फिटनेसला प्रचंड महत्व देते.

ती हार्मोनियमदेखील वाजवते. सराव करतानाचे काही व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. गिरीजा प्रभू नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

गिरीजा उत्तम खवय्यीसुद्धा आहे. नवनवीन खाद्यपदार्थ बनवण्याची तिला खूप आवड आहे. गिरीजाने ‘श्रावण क्वीन’ स्पर्धेतही भाग घेतला होता. त्यात ती उपविजेती ठरली होती. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या गिरीजाचा चाहता वर्ग मोठा आहे. गिरीजाच्या चाहत्यांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.

Back to top button