मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर असते. परंतु, वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. आमिरची फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याला गेल्या काही दिवसांपासून इरा डेट करत आहे.
व्हॅलेन्टाइनचे औचित्य साधत इराने नुपूरसोबतचे काही रोमॉंटिक फोटो शेअर केले होते. तर सध्या दोघांचा टॅटू काढण्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
इरा खान आणि नुपुर शिखरे याच्या रिलेशनशिपला एक वर्ष पुर्ण होत असून हा दिवस खास बनविण्यासाठी नुपूरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत इरा नुपूरच्या हातावर 'अँकर' चे डिझाईन असलेला टॅटू काढताना दिसत आहे. यावेळी इराने काळ्या रंगाचा टी शर्ट घातला आहे.
या व्हिडिओ शेअर करताना नुपूरने 'कारण मी तिला मदत करू शकत नाही. एका वर्षानंतर. जेव्हा तु माझ्या हातावर टॅटू काढलास याबद्दल इरा खान तुझे मी आभार व्यक्त करत आहे. तू किती छान आहेस. कोण म्हणेल की, हा तुझा पहिला टॅटू आहे.' कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे.
नुपूरच्या या व्हिडिओवर इराने आपली प्रतिक्रिया देत तीन कमेंट्स केल्या आहेत. यात पहिल्यांदा इरा 'आय लव्ह यू, आता या आणि मला तुमचा अँकर द्या.' दुसऱ्यांदा 'तर तू माझा संपुर्ण वेळ व्हिडिओ करत होतास. अशा कमेंट्स करत तिसऱ्यांदा प्रेमाचा ईमोजी शेअर केला आहे. यावरून ईरा आणि नुपूर शिखरे याच्या नात्याचा उलघडा झाला आहे.
हा व्हिडिओ शेअर होताच अनेक चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. यात एकाने 'इराचे प्रेम चांगले असून तिची कलाकुसर अप्रितम आहे'. तर दुसऱ्याने 'सुंदर', 'अप्रतिम' अशा कमेंट्स केल्या आहेत.
या व्हिडिओला चाहत्यांसोबत खास करून अभिनेत्री फातिमा सना शेखने आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात तिने 'तुम्ही सर्वात सुंदर कपल असल्याचे म्हटलं आहे.' फातिमा सना शेख इराचे वडील आमिर खानसोबत 'दंगल' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटांमध्ये दिसली आहे.
याआधी सोशल मीडियावर इरा खानचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत इरा नुपूरकडून बॉक्सिंग शिकताना दिसत होती. हा व्हिडिओदेखील नुपूरने आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओत इरा आणि नुपूरने एकमेंकाने अलिगन दिल्याने दोघांच्या नात्याचा उलगडा झाला होता.
हेही वाचलंत का?