पुढारी ऑनलाईन डेस्क : साधारणपणे ९० वर्षांपूर्वी आपल्या देशात अर्थात भारतीय वायुसेना तयार झाली. ८ ऑक्टोबर १९३२ रोजी वायुसेनेचा पाया रचला गेला. त्यामुळेच ८ ऑगस्ट हा दिवस 'भारतीय वायुसेना दल'चा (Air Force Day 2021) मानला जातो. प्रारंभीच्या काळात वायुसेना दलात ४ वेस्टलॅंड वापिती बायप्लेन्स होते आणि ५ भारतीय पायलट होते. सध्या भारतीय वायुसेनेत १७२० हून अधिक विमाने आहेत, तर १ लाख ७० हजारांहून अधिक वायू सैनिक आहेत. यानिमित्ताने (Air Force Day 2021) वायुसेनेचे ११ असे पराक्रम सांगणार आहोत, ज्यामध्ये भारतीय वायुसेनेने महत्वाची भूमिका पार पाडली.
जपानी सेनेना पळवून लावले
दुसऱ्या महायुद्धात जेव्हा जपानी सैन्य बर्माच्या दिशेने पुढे येते होते. तेव्हा भारतीय वायुसेनेने त्यांना थांबविलं. यासाठी भारतीय वायुसेनेने थायलंडमध्ये अराकान, माए होंग सोन, चियांग माई आणि चियांग राई बेस असणाऱ्या जपानी सैनिकांना भारतीय वायुसेनेने पळवून लावलेले होते. यावेळी भारतीय वायुसेना ब्रिटिश आणि अमेरिकेच्या सैनिकांची मदत करत होती. या युद्धाचे हिरो होते फ्लाईट लेफ्टनंट अर्जुन सिंह होते. शेवटी ते एअरफोर्सचे मार्शल झाले.
काश्मिरी लोकांची सुटका केली
देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले. त्याचवेळी जम्मू-काश्मीरच्या राजेशाही गादीवर कबीलाई हल्लेखोरांनी हल्ला केला. यांना पाकिस्तानकडून समर्थन देण्यात आले होते. तेव्हा दोन देशांमध्ये अघोषीत युद्ध सुूरू होतं. जेव्हा काश्मिरी लोक त्यामध्ये अडकले, तेव्हा वायुसेनेने त्यांची सुटका केली.
गोव्याला स्वातंत्र्य मिळाले
१९६० मध्ये काॅंगोमधून बेल्जियमचे शासन गेले. त्यानंतक काॅंगोमध्ये हिंसा आणि बंडखोरी होऊ लागली. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी भारतीय वायुसेनेने ५ स्क्वाड्रन काॅंगोला पाठवून दिले. कारण, तिथे शांतता निर्माण होईल. त्यानंतर १९६१ मध्ये पोर्तुगीज गोवा सोडण्यास तयार नव्हते, तेव्हा भारतीय वायुसेनेने ऑपरेशन राबवले. त्यात पोर्तुगिजांचा पराभव झाला आणि गोव्याला स्वातंत्र्य मिळाले.
पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकवला
१९४७ नंतर जम्मू-काश्मिरवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने दुसऱ्या हल्ला करण्याची धमकी दिली. तेव्हा भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनाच खाली पाडले नाही, तर अनेक पाकिस्तानच्या लष्करी छावण्या नष्ट केल्या. पण, भारतीय वायुसेनेचंही खूप नुकसान झालं. पण, आपल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला.
बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं
साधारणपणे ५० वर्षांपूर्वी पाकिस्तान सेनेतील तब्बल ९३००० सैन्यांनी पांढरे झेंढे दाखवले आणि भारतीय वासुसेना व मुक्तिवाहिनीसमोर त्यांना आत्मसमर्पण केले. त्यानंतर १९७१ च्या भारत-पाक युद्धाचा शेवट झाला. यातून पाकिस्तानपासून बांगलादेशाची निर्मिती झाली. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय वायुसेनेच्या विमानांनी १२ हजारांहून जास्त उड्डाणे केली. तेव्हा पाकिस्तानने राजस्थान, गुजरात आणि जम्मू-काश्मिरवर हल्ला केला. यामध्ये पाकिस्तानच्या ९४ विमानांना भारतीय वायुसेनेने पराभूत केलं.
सियाचिनची रणभूमी मिळवली
भारतीय वायुसेनेच्या मदतीने भारतीय भुदलाने १३ एप्रिल १९८४ मध्ये ऑपरेशन मेघदूत चालवून सियाचिनवर हल्ला केला. त्यानंतर भारताच्या हातात संपूर्ण सियाचीन ग्लेशियर आला. याचा फायदा असा झाली की, भारताच्या रणनिती क्षेत्रात ३००० चौ. किमी क्षेत्रफळ आले.
श्रीलंकेला महत्वपूर्ण मदत केली
१९४७ मध्ये श्रीलंकेत तामिळ विद्रोहकर्त्यांचं नागरी युद्ध सुरू होतं. तेव्हा श्रीलंकेने भारत सरकारकडे मदत मागितली. त्यानंतर भारतीय वायुसेनेने ऑपरेशन पूमलाई चालविले. कारण, विद्रोहांचा नागरिकांना उपद्रव होणार नाही. यासाठी त्याच वर्षी ऑपरेशन 'पवन'देखील चालविले. कारण, श्रीलंकेचे १ लाख सैनिकांना उत्तर आणि पूर्व भागातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आले. त्यावेळी भारतीय वायुसेनेने आपल्या विमानांची ७० हजार उड्डाणे केली होती.
मालदीवच्या राजधानीला सुरक्षित केलं
३ नोव्हेंबर १९८८ साली भारतीय वायुसेनेच्या आग्रा येथून मालदीवच्या राजधानीत ४ मिराज फाईटर जेट आणि आईएल-७६ उतरविले. कारण, राष्ट्रपती गयूम यांनी मदत मागितली होती. त्यांच्या देशात शस्त्रधाऱ्यांनी नियंत्रण मिळवले होते. ते मालदीवच्या राजधानीत हल्ला करणार होते. यात भारतीय वायुसेनेने हल्लाकर्त्यांचा खात्मा केला. ऑपरेशन कॅक्टस, असं या ऑपरेशनचं नाव होतं.
कारगील युद्धात वायुसेनेचा विजय
कारगील युद्धात भारतीय भू-दलाने आणि वायुसेनेची मदत मागितली. त्यावेळी वायुसेनेने हेलिकाॅप्टर आणि लढाऊ विमानांच्या मदतीने कारगिलच्या पर्वतांवर हल्ला केला. पण, हेलिकाॅप्टर आणि मिसाइल हल्ल्यात उद्धवस्त झाले. त्यानंतर भारतीय वायुसेनेने रणनिती बदलली. त्यानंतर मिराज आणि रशियन फायटर जेट मिग-२९ ने पाकिस्तानच्या घुसखोरांच्या ठिकाणांनर हल्ला केला. पूर्ण कारगील युद्धात वायुसेनेने प्रत्येक दिवसांत किमान ४० उड्डाणे केली. शेवटी २६ जुलैला भारतीय वायुसेनेचा विजय झाला.
पुलवामाचा हल्ल्याचा बदला घेतला
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला केला. सीआरपीएफचे ४६ जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय वायुसेनेने १५ दिवसांच्या आत पाकिस्तान अधिकृत काश्मिरमधील बालाकोट, चकोठी, मुजफ्फराबादमध्ये १२ मिराज-२००० फायटर प्लेनद्वारे हल्ले केले आणि पाकिस्तानला चांगला धडा शिकवला.
हे वाचलंत का?