पुढारी ऑनलाईन : हमास- इस्रायल दरम्यान पाचव्या दिवशीही संघर्ष सुरु आहे. या युद्धादरम्यान एक २५ वर्षीय महिला चर्चेत आली आहे. या निडर इस्रायली महिलेने रहिवाशांच्या एका गटाचे नेतृत्व करून दोन डझनाहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारून संपूर्ण किबुट्झ समुदायाला वाचवले आहे. या घटनेत तिने स्वतः ५ दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. ही महिला इस्रायलच्या किबुट्झ समुदायासाठी हिरो ठरली आहे. इनबार लिबरमन असे तिचे नाव आहे. किबुट्झ हा इस्रायलमधील एक समुदाय आहे जो पारंपारिक शेतीवर अवलंबून आहे.
संबंधित बातम्या
वाला न्यूजनुसार, इनबार लिबरमन ह्या डिसेंबर २०२२ पासून किबुट्झ नीर अॅमच्या सुरक्षा समन्वयक आहेत. इनबार लिबरमन यांनी शनिवारी पहाटे स्फोटाचे आवाज ऐकले, जेव्हा दहशतवाद्यांनी इस्रायलवर अभूतपूर्व हल्ला केला होता. तिला किबुट्झवरील नेहमीच्या रॉकेट हल्ल्यांदरम्यान ऐकू येणाऱ्या आवाजापेक्षा हा आवाज वेगळा जाणवला. हा हल्ला गाझा पट्टीतून सीडरोट जवळ होत होता आणि यावेळी दगडफेक झाली. त्यानंतर लीबरमनने सतर्कता दाखवत शस्त्रागाराकडे धाव घेतली आणि १२ सदस्यीय सुरक्षा पथकाच्या हातात बंदुका दिल्या.
तिने किबुट्झ यांची तुकडी संपूर्ण वस्तीवर मोक्याच्या ठिकाणी तैनात केली आणि घातपात घडवून आणण्याची दहशतवाद्यांची कारवाई हाणून पाडली.
लिबरमनने स्वतः पाच दहशतवाद्यांना ठार केले. तर इतरांनी चार तासांत आणखी २० जणांना मारले. त्यांनी नीर ॲमला एक अभेद्य किल्ल्याच बनविला. पण जवळच्या किबुट्झमचे मोठे नुकसान झाले, असे वाला न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
नीर ॲमचे सांस्कृतिक समन्वयक इलिट पाझ यांनी इस्रायल हायोम या न्यूज आउटलेटशी बोलताना सांगितले, "हे सर्व काही आश्चर्यचकीत होते. माझे पती स्टँडबाय युनिटचा भाग होते; ज्यानी मोठी जीवितहानी रोखण्याचे काम केले."
"त्यांनी स्फोटाचे आवाज ऐकले आणि स्टँडबाय युनिटच्या इतर सदस्यांशी आणि इनबालशी स्वतःहून संपर्क साधला. त्यांना तयार राहण्यास सांगण्यात आले. पण इनबार लिबरमनने क्षणाचाही विलंब न करता कारवाई सुरु केली. तिने असे केल्यामुळे डझनभर लोकांची जीवितहानी टळली," असे त्या पुढे म्हणाल्या. एका सोशल मीडिया पोस्टने या वीर महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे, असे वृत्त मारिव दैनिकाने दिले आहे.
"जेव्हा हमास- इस्रायल थांबेल तेव्हा या महिलेला इस्रायलकडून तिच्या शौर्याचे नक्कीच बक्षीस मिळेल. तिच्या वीरतेची कहाणी इस्रायल पिढ्यानपिढ्या विसरणार नाही अशीच आहे." असे एका पोस्टमध्ये म्हटले आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये किमान ९०० लोक मरण पावले आहेत आणि २,६०० इतर जखमी झाले आहेत. हमास आणि इस्रायलमधील एकूण मृतांचा आकडा ३ हजारांवर गेला आहे.
हे ही वाचा :