

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल- हमास युद्धाचा आज (दि.११) पाचवा दिवस आहे. इस्रायलने काल रात्रभर गाझामध्ये हवाई हल्ले सुरूच ठेवले. या युद्धातील मृतांची संख्या तीन हजारांहून अधिक झाली आहे. दरम्यान, गाझा पट्टी पुन्हा ताब्यात घेतल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
इस्रायल गाझामध्ये हवाई हल्ल्यासह जमिनीवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इस्रायल सैन्याने दक्षिण इस्रायलमध्ये जवानांची जमवाजमव सुरु केली आहे. लष्करी उपकरणांसह राखीव दलाच्या अधिक सदस्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. इस्रायलवर हमासचा अभूतपूर्व हल्ला आणि गाझामधील प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ले यांचा एकत्रित मृत्यू आत्तापर्यंत 3,000 पार झाला आहे. दरम्यान, इस्रायली संरक्षण दलाने घोषित केले आहे की त्यांनी गाझा सीमेला लागून असलेल्या दक्षिण इस्रायलवर नियंत्रण मिळवले आहे.
इस्रायलने मंगळवारी रात्रभर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये गाझामधील हमास लष्करी कमांडर मोहम्मद देईफ यांच्या वडिलांच्या घराला लक्ष्य केले गेले.इस्रायलने जाहीर केले आहे की त्याच्या सैन्याने गाझा सीमावर्ती भाग हमासच्या दहशतवाद्यांपासून परत मिळवला आहे, जेथे पॅलेस्टिनी गटाने हल्ला सुरू केल्यापासून अनेक हत्या झाल्या आहेत. इस्त्रायली सैन्याने या भागातील अनेक भाग आणि रस्ते ताब्यात घेतले आहेत.इस्रायलने आपल्या सैन्याला संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते.
इस्रायल आणि गाझा सीमेवर शनिवारी पहाटे नेमकं काय घडलं?
हमास आणि इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी शनिवारी सकाळी गाझा पट्टीतून इस्त्रायलवर हजारो रॉकेट डागले. यानंतर दहशतवाद्यांनी अत्यंत भक्कम सुरक्षाकडे भेदत गाझा सीमेजवळील ज्यू वस्तीत घुसखोरी केली. नागरिक आणि सैनिकांवर अंदाधूंद गोळीबार केला. नागरिकांना ओलीस ठेवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला. गेल्या पाच दशकात प्रथमचइस्त्रालयवर एवढा मोठा आणि अभूतपूर्व हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमास विरुद्ध युद्ध सुरु झाल्याचे जाहीर केले. तसेच पॅलेस्टिनींना याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही दिला होता.
हेही वाचा :