Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धाच्या झळा.. महागाई वाढणार! | पुढारी

Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धाच्या झळा.. महागाई वाढणार!

कोरोना महामारीनंतर जगासमोर रशिया युक्रेन युद्धाचे संकट उभे राहिले. हे युद्ध एक वर्षानंतरही अद्याप सुरूच असताना आता इस्रायल- हमासच्या युद्धाने जगासमोर आणखी एक नवे संकट उभे राहिले आहे. जर हे युद्ध अधिक लांबले, तर त्याचा भारतावरही दुष्परिणाम होऊ शकतो. भारत आणि इस्रायलमध्ये अतिशय मजबूत असे व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे या युद्धाने भारताचे अब्जावधी रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्याची ही माहिती….. (Israel Hamas war)

अर्थव्यवस्था

जर इसायल आणि हमासमधील युद्ध दीर्घकाळ सुरू राहिले, तर भारताच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसू शकतो. भारत आणि इस्रायलदरम्यान अब्जावधी डॉलर्सचा व्यापार होतो. त्यामुळे युद्ध लांबले, तर त्याचा व्यापारावर दुष्परिणाम होऊन अब्जावधी रुपयांचे नुकसान होऊ शकते. युद्धामुळे भारताच्या आयात-निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे देशात महागाई वाढू शकते. परिणामी पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकू शकतात

आयात-निर्यात

भारत आणि इसायलमध्ये केवळ राजनैतिकच नव्हे, तर व्यापारी संबंधही मजबूत आहेत. भारताशी इस्त्रायलचा व्यापार १० अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक आहे. निर्यात ८.५ अब्ज डॉलर्सची, तर आयात २.३ अब्ज डॉलर्सची आहे. भारत इस्त्रायलकडून मोती, हिरे, दागिने, खते, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, सुटे भाग आणि कच्चे तेल खरेदी करतो. तसेच हिरे, ज्वेलरी, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, • इंजिनिअरिंगशी संबंधित वस्तू विकतो. भारतीय व्यापाऱ्यांनीही इसायलमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. भारताचे बडे उद्योगपती गौतम अदानी यांनीही तिथे मोठी गुंतवणूक के क केली आहे. इस्रायलमधील सर्वात मोठे बंदर ‘हाईफा पोर्ट’ साठी अदानी पोर्ट आणि गडोट यांच्यामध्ये १.१८ अब्ज डॉलर्सचा करार झाला आहे. इसायलकडून शस्त्रास्त्रे खरेदी करणाऱ्या देशांमध्ये भारत मोठा खरेदीदार देश आहे. त्यामुळे जर युद्ध लांबले, तर आयात-निर्यातीलाही फटका बसू शकतो व त्यामुळे भारताचे नुकसान होऊ शकते. (Israel Hamas war)

महागाई

युद्धाचा सर्वाधिक परिणाम सध्या दिसून येत आहे. जर युद्ध संपूर्ण पश्चिम आशियात व्यापले व अन्यही काही देश यामध्ये सहभागी होऊ लागले, तर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो. जर तसे घड र किमतींवर परिणाम पाण तर र परिणाम होऊन इंधन दरवाढ होऊ शकते. भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींशी अन्य वस्तूंच्या किमतीही निगडित आहेत. जर मालवाहतूक महागली, तर खाण्या-पिण्याच्या वस्तूही महाग होतील. इस्रायलसाठी भारत आशियातील तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश आहे. इस्रायलच्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे. युद्धस्थितीत या व्यापारावर परिणाम होऊ शकतो.

सोने, शेअर बाजारावर परिणाम

युद्धामुळे सोन्याच्या किमती वाढू शकतात. शेअर बाजारात घसरण झालेली दिसूनही आली. युद्धामुळे भारतापासून युरोपपर्यंत बनणाऱ्या इकॉनॉमिक कॉरिडोरवरही संकटाचे ढग गोळा झाले आहेत. त्याचा परिणाम शिपिंग (जहाज बांधणी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सवरही दिसून आला. ज्या कंपन्यांना या कॉरिडोरमुळे फायदा होऊ शकतो, त्यांच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली. जर हे युद्ध दीर्घकाळ चालले. तर केवळ भारतच नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे पुरवठा साखळीवर दुष्परिणाम होईल आणि अनेक गरजेच्या वस्तूंची पूर्तता होणे कठीण होईल. (Israel Hamas war)

हेही वाचा : 

Back to top button