पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील हाजी अली दर्ग्यामध्ये चादर, फुलांऐवजी ट्रस्टला देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Haji Ali Dargah) यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये खादिम अनुयायांना पैसे देण्याऐवजी ट्रस्टला पैसे देण्यास सांगत आहेत. या देणगीचा वापर दर्गा परिसराच्या नूतनीकरणासाठी, कोविड आणि मुसाफिरखाना, धर्मादाय कार्यांसाठी केला जाईल. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हाजी अली दर्गाचे खादिम भाविकांना फुले आणि चादर खरेदी करण्याऐवजी ट्रस्टला पैसे देण्यास सांगत आहेत. हा पैसा दर्ग्याच्या विकासासाठी आणि त्यातून चालवल्या जाणार्या विविध सेवाभावी उपक्रमांसाठी वापरला जाईल. (Haji Ali Dargah)
हाजी अली दर्गा हा सुफी संत पीर हाजी अली शाह बुखारी (आर.ए.) यांना समर्पित आहे आणि सुफी संताच्या समाधीवर चादर आणि फुले अर्पण करण्याची भक्तांची प्रदीर्घ परंपरा आहे. चादर आणि फुले स्वीकारणारी व्यक्ती म्हणजे खादिम.
सोमवारी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये खादिम जावेद कुरेशी अनुयायांना पैसे देण्याऐवजी ट्रस्टला देण्यास सांगत आहेत, ज्याचा वापर सुरू असलेल्या दर्गा परिसराच्या नूतनीकरणासाठी केला जाईल, कोविड दरम्यान धर्मादाय कार्ये आणि मुसाफिरखाना बनवण्यात येणार आहे, त्यासाठी केला जाईल. जावेद यांचे म्हणणे ऐकण्यासाठी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. हाजी अली दर्गा ट्रस्टचे विश्वस्त, सोहेल खंडवानी आणि दर्गा ट्रस्टचे प्रशासक यांनी या वृत्ताची पुष्टी केली.
दर्ग्याचे प्रशासक मोहम्मद अहमद म्हणाले, "खादिम प्रवक्ता नाही, त्यामुळे तो बोलू शकत नाही." हाजी अली दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी सांगितले की, "अनेक वेळा शिळी फुले अर्पण केली जात होती आणि म्हणूनच त्यांनी असे आवाहन केले.
फुलांचा पुनर्वापर केला जातो आणि चादरचे काय होते याबद्दल विचारले असता खांडवानी म्हणाले, "आमच्याकडे त्यासाठी जागा नाही. आम्ही ते वेगवेगळ्या ठिकाणी वितरित करू."