पुणे शहराच्या दक्षिण-उत्तर भागातील पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद | पुढारी

पुणे शहराच्या दक्षिण-उत्तर भागातील पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पर्वती एमएलआर टाकी, पर्वती एचएलआर टाकी, पर्वती एलएलआर आणि चिखली पंपिंग येथील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराच्या दक्षिण व उत्तर भागातील काही परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 22) बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :-
पर्वती एमएलआर टाकी परिसर :- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ इ.

पर्वती एचएलआर टाकी परिसर :- सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग-1 व 2 लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गिरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.नं. 42 कोंढवा खुर्द, साईबाबानगर आदी.

पर्वती एलएलआर परिसर :- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर.

चिखली पंपिंगवर अवलंबून असणारा परिसर :- संजय पार्क, बर्माशेल सोसायटी, पुणे एअरपोर्ट, राजीव गांधीनगर नॉर्थ व साऊथ, यमुनानगर, गणेशनगर (बोपखेल), कळस काही भाग, म्हस्के वस्ती, टिंगरेनगर गल्ली नं. 1 ते 6, एकतानगर झोपडपट्टी, सिध्देश्वर कुमार समृध्दी, प्री-पार्क सोसायटी, पराशर सोसायटी, ठुबे पठारे वस्ती, दिनकर पठारे वस्ती इत्यादी.

Back to top button