Siddhi Patne : गोव्याच्या किनाऱ्यावर फेम सिध्दीचं प्री-वेडिंग फोटोशूट

sidhi patne
sidhi patne
Published on
Updated on

गोव्याच्या किनाऱ्यावर फेम अभिनेत्री सिद्धी पाटणे (Siddhi Patne) लवकरचं लग्न बंधनात अडकणार आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्यामुळे लोकप्रिय झालेली सिद्धी विशाल दलालसोबत वलग्न करणार आहे. त्याआधी दोघांनी प्री-वेडिंग फोटोशूट केलाय. विशाल एक आर्किटेक्ट आहे.

काही दिवसांपूर्वी सिद्धीने तिच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत ही गोड बातमी दिली होती. आता तिने प्री-वेडिंग फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

मध्यंतरी तिने विशाल दलालसोबत वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनचे खास फोटोज तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
तिने प्रेमा तुझा रंग कसा, विठू माऊली, श्री गुरुदेवदत्त, सांग तू आहेस का? या मालिकांमध्ये काम केले आहे.

श्री गुरुदेव दत्त या मालिकेत तिला पार्वतीची भूमिका मिळाली होती.

सांग तू आहेस का या स्टार प्रवाहवरील मालिकेतून ती शांभवीच्या भूमिकेत दिसली.

सिद्धीचा जन्म २१ जुलै १९९३ रोजी रत्नागिरीमधील खेड येथे झाला.

रत्नागिरीमध्ये तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

पुढे मुंबई युनिव्हर्सिटीमधून तिने एमबीएचे शिक्षण घेतले.

मालिका चित्रपटातून काम करत असताना तिला एका व्हिडीओ अल्बममध्ये झळकण्याची नामी संधी मिळाली.

गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्यात तिच्यासोबत सुह्रुद वार्डेकर आहे. या अल्बमनंतर त्या दोघांनी अनेक म्युजिक अल्बममध्ये एकत्र काम केले आहे.

गोव्याच्या किनाऱ्यावर गाण्याचे शूटिंग अलिबाग येथे झाले आहे.

सुह्रुद वार्डेकर-सिध्दीने मिळून 'प्रथम नमो' व 'भास तुझा'मध्ये काम केले आहे.

हेदेखील वाचलं का?-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news